अॕडिनोव्हायरसचा त्रास, मुलांमध्ये ताप येणे, घसा खवखवणे आणि डोळे लाल होणे, जुलाब होणे अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करु नका

सध्या अनेक मुलांमध्ये वेगवेगळे त्रास दिसून येत आहेत. विशेषतः ताप, घसा खवखवणे याचे अधिक प्रमाण दिसतेय. ज्या मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा मुलांवर अँडिनोव्हायरस या विषाणूचा परिणाम होतो. शाळकरी मुलांमध्ये ताप येणे, घसा खवखवणे आणि डोळे लाल होणे, जुलाब होणे अशा तक्रारींमध्ये अचानक वाढ झाल्याचं शहरातील बालरोगतज्ञ सांगत आहे. या सगळ्या तक्रारी फक्त लहान मुलांमध्ये जाणवत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 70% आजारी मुलांमध्ये अॕडिनोव्हायरसची लक्षणं दिसत आहे. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​५ ते १५ वयातील मुलांमध्ये अधिक प्रादुर्भाव​

​५ ते १५ वयातील मुलांमध्ये अधिक प्रादुर्भाव​

५ ते १५ या वयोगटातील मुलांमध्ये या व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवत आहे. हा जीवघेणा आजार नसून आजाराची लक्षणे पूर्णतः निघून जाण्यास किमान ७ दिवसांचा कालावधी लागतो. यावर काही विशेष औषध नसून ताप,घसा आणि मूत्र संसर्गानर प्रोबायोटिक्स तर डोळ्यांकरिता ड्रॅाप्स दिले जात असल्याची प्रतिक्रिया पुण्यातील मदरहुड हॉस्पिटलच्या नवजात शिशु व बालरोग तज्ज्ञ डॉ तुषार पारीख यांनी दिली. मुलांना गर्दीच नेणे टाळा, हातांची स्वच्छता राखा, अस्वच्छ हातांनी नाकाला, तोंडाला स्पर्श करणे टाळण्याचा सल्ला देखील डॉ पारेख यांनी दिला.

हेही वाचा :  गरोदरपणादरम्यान ग्लुकोजची पातळी तपासणे ठरते महत्त्वाचे, अन्यथा जन्मतःच बाळ मृत होण्याची शक्यता

​अॕडिनोव्हायरस वाढतोय​

​अॕडिनोव्हायरस वाढतोय​

अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. सम्राट शहा म्हणाले की, अॕडिनोव्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अॕडिनोव्हायरस सामान्यत: संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरत आहे. जसे की स्पर्श होणं, खोकणे किंवा शिंकण्यातून हा विषाणू पसरण्याचा धोका असतो.

( वाचा – डायबिटीस रुग्णांना इन्शुलिनची कधी गरज भासते? वयानुसार किती असावे इन्शुलिनचे प्रमाण)

​सतत स्पर्श केल्याने विषाणूची लागण​

​सतत स्पर्श केल्याने विषाणूची लागण​

या व्यतिरिक्त संक्रमित वस्तूला स्पर्श करणे, तोंड, नाक किंवा डोळ्यांना स्पर्श केल्यानं या विषाणूची लागण होऊ शकते. लहान मुलाचे डायपर बदलताना पालकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. कारण अॕडिनोव्हायरसचा संसर्ग होऊ शकतो.

(वाचा – Chocolate Day: खराब कोलेस्ट्रॉलवर मात करण्यापासून ते हृदय मजबूत होण्यापर्यंत चॉकलेट्सचे आरोग्यदायी फायदे)

​नियमित हात धुणे गरजेचे​

​नियमित हात धुणे गरजेचे​

मुख्यतः हा संसर्ग शाळेतील मुलांना होत आहे. त्यामुळे संसर्गाचं हे प्रमाण रोखण्यासाठी मुलांना बाहेरुन आल्यावर नियमितपणे पाण्याने कमीत कमी २० सेकंद हात धुवायला सांगावे. या आजारावर कोणताही विशिष्ट उपचार नाही. परंतु, मुलांना असलेल्या लक्षणांवरून यावर औषधोपचार डॉक्टर देत आहेत. परंतु पालकांनी मुलांमध्ये काही बदल दिसून आल्यास पालकांनी विलंब न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. शहा म्हणाले.

हेही वाचा :  Ovulation Period म्हणजे काय? आई होण्यापूर्वी जाणून घेणे का गरजेचे

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …