काय घडलं होतं?

चित्रा सिंग यांच्या पहिल्या लग्नाचा संसार सुखी नव्हता. त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात जगजित सिंग यांची एन्ट्री झाली. चित्रा यांच्या नात्यासोबत जगजीत सिंग खूप जास्त सिरीयस होते. त्यांनी थेट पहिल्या नवऱ्याकडेच चित्रा यांचा हात मागितला. पुढे चित्रा आणि जगजीत सिंग यांचे लग्न झाले. पुढे त्यांना विवेक नावाचा मुलगा सुद्धा झाला. पण 1990 मध्ये एका अपघातात त्यांना आपला मुलगा गमवावा लागला. हे संकट संपत नाहीच तोवर अजून एक बातमी आली त्यांच्या पहिल्या नवऱ्यापासूनच्या मुलीच्या आत्महत्येची! यामुळे चित्रा सिंग अगदीच हताश झाल्या. याचा परिणाम जगजित सिंग यांच्या आयुष्यावर सुद्धा झाला. 2011 मध्ये ते सुद्धा चित्रा यांना सोडून गेले. म्हणजेच जगजित सिंग यांना सुद्धा देवाज्ञा झाली. म्हणजेच एकामागोमाग एक त्यांच्या जवळच्या व्यक्ती त्यांना सोडून गेल्या आणि त्या एकट्या पडत गेल्या.
(वाचा :- सारं काही सोन्यासारखं असूनही लतादिदींनी का नाही केलं आयुष्यभर लग्न? असे निर्णय जे बदलून टाकतात संपूर्ण आयुष्य!)
पण त्या आशावादी राहिल्या

पण ही सगळी संकटे झेलून सुद्धा चित्रा खंबीर राहिल्या. त्यांनी आपल्या मुलीच्या मुलांनाच आपले कुटुंब मानले. एका मुलाखती मध्ये त्यांनी सांगितले होते की, ही दोन्ही मुलेच आता माझं सर्वस्व आहेत. त्यांची काळजी घेणे, त्यांना सांभाळणे यातून मला खूप आनंद मिळतो. त्या पुढे असेही म्हणाल्या की, ज्या व्यक्ती त्यांना सोडून गेल्या त्या तर परत येणार नाहीत पण जे सोबत आहेत त्यांच्यासोबत त्या आयुष्य नक्कीच जगू शकतात. जाणकार सुद्धा अशा वेळी निराशेमधून आशा शोधा असाच सल्ला देतात. एक अशी गोष्ट जी तुम्हाला पुन्हा नव्याने आयुष्य जगण्यास प्रेरित करेल. चित्रा यांनी तेच केले.
(वाचा :- या लाल लेहग्यांतील झिरो फिगर बंगाली नवरीला पाहून वाढली चाहत्यांच्या हृदयाची धडधड, बंगाली विधींमधून उलगडला नात्याचा नवा अर्थ..!)
संकटाला सामोरे जा

जाणकार हे सुद्धा सांगतात की कोणत्याही संकटा विरुद्ध तुम्हाला जिंकायचे असेल तर दूर पळायचे नाही तर त्या संकटाला सामोरे जायचे आहे. यातून मनातील भीती कमी होते. एक आशा निर्माण होते. चित्रा आपल्या आयुष्याबद्दल सांगताना म्हणतात की, त्यांना आजही जगजित सिंग यांच्या आठवणींमधून प्रेरणा मिळते. त्यांनी नेहमीच चित्रा यांना आशावादी राहायला शिकवले. म्हणूनच त्यांच्या जाण्याने चित्रा पूर्णपणे तुटल्या पण त्यांच्याच आठवणीतून त्या पुन्हा उभ्या सुद्धा राहिल्या.
(वाचा :- उगाच नाही लाखो मुलींमधून श्लोकाच बनली अंबानी कुटुंबाची सूनबाई, इतक्या परीक्षा पास केल्यानंतरच केली गेली निवड..!)
अध्यात्माचा आधार

या काळात चित्रा सिंह यांनी अध्यात्माचा सुद्धा आधार घेतला. त्यांचा पूर्वीपासून अध्यात्माकडे ओढा होता आणि या कठीण काळाने त्यांना अध्यात्माच्या अजून जवळ नेले. मानसोपचारतज्ज्ञ सुद्धा सांगतात की कठीण काळात त्याच गोष्टींचा जास्त विचार करावा ज्या तुम्हाला आनंद देतील. जेवढे तुम्ही वाईट विचार मनात आणाल तेवढे तुम्हाला हे जीवन वाईट वाटू लागेल. अध्यात्म एक अशी गोष्ट आहे जी मनाला शांतता देते आणि आयुष्य जगण्यास प्रेरणा देते. त्यामुळे मंडळी तुम्ही सुद्धा अशा फेज मधून जात असाल तर नक्कीच अध्यात्माचा आधार घ्या.
(वाचा :- माझी कहाणी : नणंदेच्या संशयामुळे नवरा कायमचा माझ्यापासून दूर गेला, नणंदेला वाटतं मी बायसेक्शुअल आहे कारण..!)
सत्य स्वीकारणे

चित्रा यांनी भावूक होत एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “आयुष्य हे क्षणभंगुर आहे. हे तुम्ही जगा किंवा जगायला शिका. ते तुमच्या हातात आहे. आयुष्य तुम्हाला त्याच्या पद्धतीने जगायला लावेल, पण तुम्हाला कळलं पाहिजे की स्वत:च्या आनंदासाठी ते कसं जगायचं आहे. आता मला मृत्युचे सुद्धा भय राहिले नाही कारण संकटे तर कायम येतच राहणार, त्यांना घेऊन पुढे जायचं की हरवून हे ज्याने त्याने ठरवलं पाहिजे.” असा मोलाचा सल्ला चित्रा सिंग यांनी दिला होता. यामुळे चित्रा यांचे आयुष्य खरंच खूप प्रेरणादायी आहे जे कठीणात कठीण काळाचाही धैर्याने कसा सामना करायचा हे शिकवते. कदाचित चित्रा यांची कहाणी ऐकल्यावर आयुष्यासमोर हात टेकलेल्या अनेकांना जगण्याची नवी उमेद मिळू शकते व ते नव्याने सुरूवात करू शकतात.
(वाचा :- माझी कहाणी : बॉससोबत प्रेमसंबंध ठेवल्यामुळे मला प्रमोशन मिळालं, पण त्या बदल्यात बॉसने माझ्याकडून हिरावून घेतली ही किंमती गोष्ट..!)