रोज १५ मिनिट्स मारा दोरीच्या उड्या आणि करा झटपट वजन कमी, दोरी उड्या मारण्याचे फायदे

खेळ आणि फिटनेसशी संबंधित सर्वच लोक आपल्या वर्कआऊटमध्ये दोरी उड्या मारणे नक्कीच समाविष्ट करून घेतात. दोरी उड्या मारून संपूर्ण शरीराला चांगला व्यायाम मिळतो. शारीरिक व्यायामात दोरी उड्या मारणे हे अत्यंत चांगले मानले जाते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहाते आणि त्याशिवाय तुमची एकाग्रता वाढण्यास अधिक मदत मिळते. याशिवाय शरीराला लवचिकता मिळते. मानसिक आरोग्यही चांगले राहण्यास फायदा मिळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या व्यायामामध्ये तुम्ही दोरी उड्या मारण्याचा व्यायाम नक्कीच समाविष्ट करून घ्यायला हवा. दोरी उड्या मारण्याचे फायदे घ्या जाणून.

कॅलरी बर्न करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी मिळते मदत

Burn Calorie And Helpful For Weight Loss: दोरी उड्या रोज मारल्यामुळे जलद गतीने तुमची कॅलरी बर्न होते अर्थात पोटावरील चरबी जाळण्याचे काम जलद होते आणि या व्यायामामुळे तुमच्या शरीरातील मांसपेशी अधिक मजबूत होतात. पोटाची चरबी लवकर कमी होते. साधारण १५ मिनिट्स रोज दोरीच्या उड्या मारल्याने ३०० कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते. कोणत्याही कार्डिओ व्यायामापेक्षाही दोरी उड्या मारणे हा अधिक परिणामकारक व्यायाम आहे.

हेही वाचा :  Nose block remedies: थंडीत सर्दीने नाक बंद होते, तुम्ही या समस्येने हैराण आहात तर हा घरगुती उपाय बेस्ट

हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी

For Cardiovascular Health: दोरी उड्या रोज मारल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग चांगले राहाते. कार्डिओव्हॅस्क्युलर फिटनेससाठी हा उत्तम व्यायाम ठरतो. उड्या मारल्यामुळे तुमच्या आतड्यांची क्षमताही सुधारते. इतकंच नाही तर एका अभ्यासात सांगण्यात आल्यानुसार, ज्या व्यक्तींनी सहा आठवडे रोज दोरी उड्या मारण्याचा व्यायाम १० मिनिट्स केला आहे, त्यांना हृदयाशी संबंधित फिटनेस सुधारण्यास मदतच मिळाली आहे. हा अभ्यास, एकाच जॉगर्स पार्कमध्ये एका वेळी दोरी उड्या मारण्यांवर करण्यात आला होता.

(वाचा – नैसर्गिकरित्या शरीर डिटॉक्स करण्यासाठी वापरा या सोप्या २ पद्धती, घरगुती उपाय)

मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी

Brain Health: दोरी उड्या मारणे हे मेंदूच्या आरोग्यासाठीही उत्तम ठरते. तुमच्या शरीराला आणि मेंदूला ऊर्जा आणि अधिक अलर्ट ठेवण्यास याचा उपयोग होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाग्रता वाढविण्यास याची अधिक मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला शारीरिक व्यायामासह एकाग्रता वाढवायची असेल तर नक्की दोरी उड्या मारा.

(वाचा – मलायकाच्या मॉर्निंग रूटीनमध्ये आहे या खास ड्रिंकचा समावेश, परफेक्ट फिगरसाठी रोज प्यावे)

चपळता वाढते

प्रत्येक कामाचा तुम्हाला कंटाळा येत असेल तर तुम्ही रोज सकाळी दोरी उड्या मारण्याचा व्यायाम करावा. यामुळे शरीर अधिक लवचिक होते आणि चपळता वाढण्यास मदत होते. तसंच तुमच्या अंगातील आळसही यामुळे कमी होतो. कारण दिवसभर तुमच्या शरीरातील ऊर्जा यामुळे चांगली राहाते.

हेही वाचा :  आरोग्यकेंद्रात डॉक्टर नाही, शासकीय रुग्णवाहिकेत डिझेल नाही... कोपरगावात गरोदर महिलेचा मृत्यू

(वाचा – बारीक कंबर हवी असेल तर वापरा श्रद्धा कपूरच्या या फिटनेस ट्रिक्स)

शरीराचे संतुलन साधते

अन्य व्यायाम करताना कंटाळाही येतो. पण दोरीच्या उड्या हा एक मजेशीर व्यायाम आहे. शरीराचे संतुलन साधण्यासाठी याची मदत मिळते. मात्र हा व्यायाम नियमित करावा. वजन कमी करण्यासह इतरही अनेक फायदे तुम्हाला मिळतात.

दोरीच्या उड्या मारण्याने कधीही नुकसान होत नाही. मात्र तुम्ही तुमच्या जिम ट्रेनरच्या सल्ल्याने साधारण किती मिनिट्स दोरी उड्या माराव्या हे जाणून घेतले तर त्याचा अधिक फायदा तुम्हाला मिळू शकतो. मात्र दोरी उड्या मारण्याचा व्यायाम तुम्ही तुमच्या रूटीनमध्ये समाविष्ट केल्यास, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.

(फोटो क्रेडिटः Freepik.com)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘एक पाऊल मागे घेतलं नसतं तर अमरावतीत…’ बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Loksabha 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघात (Amravati Loksabha Constituency) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्राहर …

सोन्याच्या तब्बल 6600 विटा, 132 कोटींचा ऐवज; जगातील सर्वात मोठ्या चोरीची Inside Story

Canadas gold heist Inside story : ‘मनी हाईस्ट’ या कलाकृतीनं प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळवलं. याच …