बीटीएस स्टार J-Hope सैन्यात भरती होणार; व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

J-Hope : बीटीएस (Bangtan Sonyeondan) या जगप्रसिद्ध कोरियन ब्रॅंडचा (Korean Brand)  सदस्य जे – होप (J-Hope) सैन्यात भरती होणार आहे. लाईव्ह सेशनच्या माध्यमातून त्याने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. लाईव्ह सेशनदरम्यान तो म्हणाला की,”मला माझा सहकारी जिनने सैन्यात भरती होण्याचा सल्ला दिला होता. आता लवकरच मी चाहत्यांसाठी काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. 

जे-होप एका वर्षापासून करतोय सैन्यात भरती होण्याची तयारी

जे-होप म्हणाला,”सैन्यात भरती होण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. बीटीएसचा (BTS) जिन ह्युंग सैन्यात भरती झाल्यापासून माझ्या डोक्यातदेखील सैन्यात भरती होण्याचा विचार सुरू झाला. त्यानंतर  गेल्या एका वर्षापासून मी सैन्यात भरती होण्याची तयारी करत आहे. आता मी 30 वर्षांचा झाला असून अनिवार्य लष्करी सेवेत काम करण्यात सज्ज आहे”.

सैन्यात भरती होण्यापूर्वी जे-होप चाहत्यांशी संवाद साधणार

सैन्यात भरती होण्यापूर्वी जे-होप सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधणार आहे. याबद्दल बोलताना जे-होप म्हणाला,”सैन्यात भरती होणं गरजेचं आहेत. पण चाहत्यांपासून लांब जात असल्याने मला वैयक्तिकरित्या खूप वाईट वाटत आहे. माझा पुढचा अल्बम ‘जिमीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुमच्याप्रमाणे मीदेखील या अल्बची आतुरतेने वाट पाहत आहे”. 

हेही वाचा :  उर्फीच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल; अहवाल सादर करण्याच्या मुंबई पोलिसांना सूचना

जे-होप सैन्यात भरती का होणार? 

दक्षिण कोरियातील शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या पुरुषांना वयाच्या तिशीपर्यंत सुमारे दोन वर्ष राष्ट्रीय सेवेत काम करणं बंधनकारक असतं. 18 ते 28 वयोगटातील तरुणांना लष्करात 21 महिने, नौदलात 23 महिने किंवा हवाई दलात 24 महिने यापैकी एकाची निवड करावी लागते. तसेच पोलीस, तटरक्षक दल, अग्निशमन सेवा या सरकारी विभागात काम करण्याचा पर्यायही त्यांच्यासमोर असतो. आता जे-होप 30 वर्षांचा झाला असून तो आता सैन्यात भरती होणार आहे. 

संबंधित बातम्या

Entertainment News Live Updates 28 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …