गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमचा विश्वविक्रम, गिनिज बुकमध्ये झाली नोंद

 Narendra Modi Stadium Ahmedabad: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 2022 मध्ये झालेल्या आयपीएल फायनल सामन्याने विश्वविक्रम केलाय. हा सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांच्या संख्येनं या मैदानाची नोंद गिनिज बुकमध्ये झाली आहे. बीसीसीआय आणि जय शाह यांनी हा विश्वविक्रम झाल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. (BCCI Guinness World Record)

आयपीएल फायनल सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी विश्वविक्रम केलाय. यासाठी याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. हे जगातील एकमेव क्रिकेट स्टेडिअम आहे, जिथे टी २० सामना पाहण्यासाठी इतकी गर्दी झाली. 29 मे रोजी गुजरात आणि राजस्थान यांच्यामध्ये अहमदाबाद स्टेडिअममध्ये फायनल सामना झाला होता. या सामन्यात गुजरातने सात विकेट्सनं बाजी मारली होती.  

News Reels

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने ट्वीट करत विश्वविक्रमाची माहिती दिली. बीसीसीआयने ट्वीट करत म्हटले की, ‘आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.  भारताने आपलं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये नोंदवलं आहे. चाहत्यांचं समर्थानामुळे हे शक्य झालं.’ बीसीसीआयच्या या ट्विटला सेक्रेटरी जय शाहने रिट्विट करत म्हटले की, २९ मे रोजी आयपीएलच्या अंतिम सामन्याला 101566  चाहत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. याची नोंद गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये झाली आहे. ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सर्व चाहत्यांचं आभार…

जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडिअम 
अमहदाबाद येथे असलेले नरेंद्र मोदी स्टेडियमला आधी गुजरात क्रिकेट असोसिएशन स्टेडियम या नावानं ओळखलं जातं.  मोटेरा येथे असलेल्या या स्टेडियममध्ये 1 लाख 10 हजार दर्शक बसण्याची क्षमता आहे.  ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडपेक्षा दहा हजार प्रेक्षक येथे जास्त बसू शकतात. एमसीजीची क्षमता 1 लाख 24 प्रेक्षकांची आहे.  नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडिअम आहे.  

हेही वाचा :  यंदा दुखापतीमुळे आयपीएल खेळणार नाही जोफ्रा आर्चर, तरी मुंबईने 8 कोटींना घेतलं विकत, कारण काय?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …