सायबर पोलिसांकडून आज फडणवीस यांचा जबाब | Former Intelligence Commissioner Rashmi Shukla Leader of Opposition Devendra Fadnavis Police akp 94


सायबर पोलिसांनी पाठविलेल्या प्रश्नावलीला फडणवीस यांनी उत्तर न दिल्याने त्यांना रविवारी सकाळी ११ वाजता सायबर पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

मुंबई : गुप्तवार्ता विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांचा पोलीस बदल्यांतील भ्रष्टाचाराबाबतचा अहवाल फोडल्याप्रकरणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब पोलीस आज, रविवारी नोंदविणार आहेत़  त्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयात हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी त्यांना बजावली होती. मात्र, यानिमित्ताने भाजपने शक्तिप्रदर्शनाची तयारी केल्याने पोलिसांनी फडणवीस यांच्या घरी जाऊन जबाब नोंदविण्याची भूमिका घेतली़

पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा गोपनीय अहवाल फुटल्याने गोपनीयता कायद्याचा भंग, तसेच त्यांनी बेकायदा दूरध्वनी टॅपिंग केल्याप्रकरणी मुंबई व पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सायबर पोलिसांनी पाठविलेल्या प्रश्नावलीला फडणवीस यांनी उत्तर न दिल्याने त्यांना रविवारी सकाळी ११ वाजता सायबर पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे जाहीर केले आणि भाजप नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भष्टाचार करणाऱ्यांना सोडून तो उघड करणाऱ्यांवर राजकीय हेतूने कारवाई होत असल्याची टीका आमदार आशीष शेलार यांनी केली.

हेही वाचा :  नव्या संसद भवनाचा वाद सुप्रीम कोर्टात... फडणवीस म्हणतात 'विरोधक सत्तेचे सौदागर'

पोलिसांच्या नोटिशीनंतर फडणवीस यांनी रविवारचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले. फडणवीस हे पोलीस ठाण्यात पोहोचतील तेव्हा  शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी भाजपने सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी हा निर्णय बदलला.

प्रवीण चव्हाण यांच्याबद्दल लवकरच गौप्यस्फोट

सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे तीन-चार दिवस गायब होते आणि आता सारवासारव करीत आहेत. मात्र, त्या ध्वनिचित्रमुद्रणाच्या सत्यतेबाबतचे पुरावे आहेत व न्याययवैद्यक अहवालही आहे. चव्हाण यांच्याबाबत अनेक प्रकरणांची माहिती माझ्याकडे आली असून ती तपासण्यात येत असून आणखी प्रकरणे उघड करण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला.

भाजपकडून आज आंदोलन

कोल्हापूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गृह विभागाने पाठवलेल्या नोटीशीची भाजपच्यावतीने उद्या राज्यभरात होळी केली जाणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : सध्या देशभरात नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. याशिवाय राज्यात उन्हाचा चटका …

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …