Gold Sliver Price: लग्नसराईच्या मुहूर्तावर सोनं-चांदी स्वस्त; खरेदीसाठी उत्तम संधी, काय आहेत आजचे दर?

Gold Sliver Price Today 28th April 2023: सोन्याच्या किंमतीमध्ये कधी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ही घसरण (Gold and Sliver Price Today) कायम राहणार असल्याचे पाहायला मिळते आहे. तर दुसरीकडे सोन्याचे दर हे 70 हजाराच्याही पार जाऊ शकतात याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या लग्नसराईचा मौसम आहे. एप्रिल महिन्यातही लग्नसभारंभाना कोण उधाण आले होते. त्यातून आता पुढील महिन्यातही सुट्ट्या आणि लग्नसराई याचा मोहोल पाहायला मिळणार आहे. एव्हाना लग्नघरांमध्ये सोन्याची खरेदीही सुरू झाली असेलच.

तेव्हा सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आता ही उत्तमसंधी असली तर सोन्याच्या किमतींमध्ये (Latest Gold 10 Gram Price)  मोठी चढउतार पाहायला मिळते आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर हे कमी घेण्याचे नावंच घेत नव्हते परंतु आता शुद्ध सोनं हे प्रति तोळ्याप्रमाणे कमी झाले आहे. गुडरिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, शुद्ध सोनं हे 27 आणि 28 एप्रिल रोजी 61,040 रूपये प्रति 10 ग्रॅम एवढं होतं. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत ही 55,950 रूपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. गेल्या दहा दिवसांपासून सोन्याच्या किमती या घसरलेल्या पाहायला मिळत आहेत. परंतु सोन्याच्या किमती या 60 हजारच्या खाली काही उतरलेल्या नाहीत. शुद्ध सोनं हे अद्यापही 60 हजार पार आहे. 

हेही वाचा :  Railway Job: रेल्वेमध्ये हजारो पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज

25 एप्रिल रोजी शुद्ध सोन्याची किंमत ही 60,930 रूपये प्रति 10 ग्रॅम इतकी होती. जी आदल्या दिवशीच्या किंमतीपेक्षा 220 रूपयांनी वाढली होती. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 एप्रिल रोजी ही किंमत 110 रूपयांनी वाढली होती. 26 एप्रिलला ही किंमत 110 रूपये प्रति तोळा इतकी होती. अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याच्या किंमतींमध्येही मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे 63 हजारापार गेलेले असताना हीच किंमत आता 61 हजारापर्यंत पोहचली आहे हेही काही कमी नाही. 22 कॅरेट सोनं हे 55 हजारांएवढं आहे. तर अक्षय्य तृतीयेनंतर 22 कॅरेट सोन्याचे दरही घसरलेले दिसत आहेत.

तुमच्या शहरातील दर काय? 

नाशिकमध्ये शुद्ध सोन्याचे दर हे 61,080 रूपये प्रति तोळा आहेत. तर नागपूर येथे सोन्याचे दर हे 61,040 रूपये प्रति तोळा आहेत. कोल्हापूर येथे सोनं हे नागपूर एवढंच आहे. वसई-विरार परिसरात सोन्याचे दर हे 61,080 रूपये प्रति तोळा इतके आहे. पुण्यात सोन्याचे दर 61,040 रूपये प्रति तोळा आहे. 

चांदीच्या दरात घट की वाढ? 

चांदीच्या किमती या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. परंतु आजच्या किमतीनुसार चांदीचे दर हे 300 रूपयांनी घसरले आहेत. आजच्या किमती नुसार चांदी हे 76,200 रूपये प्रति किलो आहे तर 762 रूपये प्रति 10 ग्रॅम आणि 7,620 रूपये प्रति 100 ग्रॅम इतके आहे. 

हेही वाचा :  विरार : मुलांनी फेकलेला पाण्याचा फुगा दुचाकीस्वाराला लागल्याने घडला अपघात ; सायकलस्वाराचा जागीच मृत्यू | Two wheeler and bicycle accident due to water bubble death of cyclist msr 87



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरभर 500 च्या नोटांचे ढीग! ED ला नोकराच्या घरात सापडले 25 कोटी? ‘या’ मंत्र्याशी कनेक्शन

Jharkhand ED Raid: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये आचारसंहिता लागू असतानाच झारखंडमध्ये सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …