Railway Job: रेल्वेमध्ये हजारो पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

RRB Technician Recruitment 2024 Notification: रेल्वेमध्ये चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने आरआरबी 2024 कॅलेंडर जाहीर केले आहे. एएलपी, टेक्नेशियन, नॉन टेक्नेशियन, जेई आणि इतर पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

आरआरबी भरती वार्षिक कॅलेंडरनुसार एएलपी पदाची भरती प्रक्रिया जानेवारी ते मार्च 2024 पर्यंत केली जाणार आहे. टेक्निशियन भरती प्रक्रिया एप्रिल ते जूनपर्यंत केली जाईल. नॉन टेक्निशियन पॉप्युलर कॅटेगरी-ग्रॅज्युएट (स्तर 4,5 आणि 6), नॉन टेक्निकल कॅटेगरी- अंडर ग्रॅज्युएट (स्तर 2 आणि 3), ज्युनियर इंजिनीअर आणि पॅरामेडिकल कॅटगरी भरती प्रक्रिया जुलै ते सप्टेंबर 2024 पर्यंत सुरु असेल. लेवल 1 आणि मिनिस्ट्रियल आणि आयसोलेटेड कॅटेगरी ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत केली जाईल. 

आरआरबी एएलपीसाठी सीबीटी माध्यमातून परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा जून ते ऑगस्ट 2024 च्या दरम्यान आयोजित केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील (सीबीटी -2) ची परीक्षा सप्टेंबर 2024 मध्ये होणार आहे. 

हेही वाचा :  भारतीय रेल्वेकडून महिला प्रवाशांना मिळतात 'या' 9 सुविधा, प्रत्येकाला माहिती हवीच!

अॅप्टीट्यूड टेस्ट (सीबीटी) नोव्हेंबर 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. यानंतर उमेदवारांचे डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन होईल. यानंतर निवडलेल्या उमेदवारांची यादी नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान रिलीज होईल. 

कसे पाहाल परीक्षेचे कॅलेंडर?

एकूण 9 हजार रिक्त पदांसाठी आरआरबी टेक्निकल भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी फेब्रुवारी 2024 मध्ये रोजगार समाचारमध्ये नोटिफिकेशन प्रसिद्ध केले जाणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया मार्चपासून सुरु होणार आहे. उमेदवारांना एप्रिल 2024 पर्यंत यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासंदर्भातील सविस्तर तपशील आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. 

सहाय्यक लोको पायलटची भरती 

रेल्वेकडून काही दिवसांपुर्वी सहाय्यक लोको पायलट पदाच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत सहाय्यक लोको पायलटच्या 5,696 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवार फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मॅकेनिक आणि समकक्ष आयटीआय उत्तीर्ण असावा. मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल इंजिनिअरींग डिप्लोमाधारक या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 18 ते 30 वर्षे वयोमर्यादा असलेले उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. मागासवर्गीय उमेदवारांना यातून सवलत देण्यात आली आहे. 19 फेब्रुवारी ही अर्जाची शेवटची तारीख आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही जाहिरात आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत मराठी तरुणांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. 

हेही वाचा :  St Bus Accident : काळ आला होता पण वेळ आली नव्हती... ST बसच्या ड्रायव्हरनं डोकं लावलं आणि 40 प्रवाशांचा जीव वाचवला



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …