Indian Railways : ‘ही’ रेल्वे तिकिटे कधीही रद्द करु नका, रेल्वे कर्मचारीने सांगितल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी

Indian Railways Train Ticket : आता रेल्वेचा प्रवास करताना तुम्हाला एक काळजी घ्यावी लागणार आहे. कारण रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळणे खूप अवघड काम असल्याने अनेक लोक तिकीट बुकिंग काही दिवस अगोदर करुन घेतात, जेणेकरून त्यांना शेवटच्या क्षणी काळजी करण्याची गरज नाही. काही लोक असे असतात जे शेवटच्या क्षणी रेल्वे तिकीट बुक करतात. अशा परिस्थितीत रेल्वेचे तिकीट कन्फर्म मिळणे अवघड असते. तथापि, ट्रेनचे मार्ग देखील खूप महत्त्वाचे आहेत, कारण अनेक मार्ग मुंबई, दिल्ली सारख्या गजबजलेल्या ठिकाणांमधून जात असेल, तर या मार्गांवर रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणे कठीण होते. तर काही रेल्वे तिकीट रद्द केल्यावरही परतावा मिळत नाही. 

 तिकीट रद्द केल्यावर परतावा का मिळत नाही?

आपण काढलेले रेल्वे तिकिट रद्द करतो. मात्र, काही गाड्यांचे तिकिट रद्द करताना विचार न केला तर तोटा सहन करावा लागतो.  सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ट्रेनच्या पायलटने महत्त्वाची माहिती दिली आहे. पायलट सुरेंद्र निषाद, जे अनेकदा इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करतात, ते भारतीय रेल्वेचे सरकारी कर्मचारी आहेत. ते नियमितपणे संबंधित व्हिडिओ पोस्ट करत असतात. त्यांचे 33 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ताज्या व्हिडिओमध्ये त्यांनी रेल्वे ट्रेनच्या तिकिटांची माहिती दिली आहे. व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी लिहिले की, ‘या रेल्वेची आरक्षण केलेली तिकिटे कधीही रद्द करू नका, सर्व पैसे बुडतील.’

हेही वाचा :  प्रवासात तापाने फणफणलात? रेल्वेच्या 'या' App वरुन मागा मदत, ट्रेनमध्ये लगेच येतील डॉक्टर

या तीन गोष्टी आहेत महत्त्वाच्या 

बरेचवेळा आपण रेल्वेचे तिकीट आरक्षण करतो. मात्र, काही कारणाने तिकीट रद्द केले तर नुकसान सहन करावे लागते. कारण काही गोष्टींचा विचार केला नाही तर हा तोटा सहन करावा लागतो. त्यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, “तुम्हाला माहित आहे का की रद्द केल्यावर तुम्हाला एक रुपयाचाही परतावा मिळत नाही. 

पहिली गोष्ट – कन्फर्म केलेले तत्काळ तिकीट रद्द केल्यावर रिफंड मिळत नाही. दुसरी गोष्ट – ट्रेनच्या चार्टनंतर तयार आहे. त्यानंतर तुम्ही कोणतेही कन्फर्म केलेले तिकीट रद्द केले तर तुम्हाला कोणताही परतावा मिळणार नाही. 
तिसरी बाब म्हणजे चालू तिकीट रद्द करण्यासाठीही कोणताही परतावा दिला जात नाही. जर तिकीट कन्फर्म झाले असेल तर ते शहाणपणाने रद्द करा, अन्यथा कोणताही परतावा दिला जाणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …