वडिलांच्या निधनानंतर रवीना टंडनने शेअर केले पंतप्रधान मोदींनी पाठवलेले शोकपत्र, म्हणाले “तुझे वडील…”


या पत्रात त्यांनी रवीना टंडनचे वडील रवी टंडन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन यांचे ११ फेब्रुवारी रोजी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवीनाने तिच्या वडिलांसोबतचे बालपणीचे काही फोटो शेअर करत ही दुख:द बातमी दिली होती. रवीनाच्या वडिलांचे निधन झाल्याचे कळताच सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे.

रवीना टंडनने नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या शोकपत्राचा फोटो शेअर केला आहे. या पत्रात त्यांनी रवीना टंडनचे वडील रवी टंडन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शोकपत्र

या पत्रात लिहिले आहे की, “तुमचे वडील रवी टंडन यांच्या निधनाची बातमी ऐकून फार दुःख झाले. या कठीण काळात माझ्या संवेदना तुमच्या कुटुंबासोबत आहेत. रवी टंडन यांनी आपल्या सर्जनशीलतेने आणि कौशल्याने भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध केले. त्यांना चित्रपटसृष्टीतील अनेक बारकावे चांगलेच समजत होते. चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांनी अनेक उल्लेखनीय चित्रपट सिनेविश्वाला दिले. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

हेही वाचा :  “नेहरुंच्या धोरणानेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाचवले”, संजय राऊतांचं युक्रेनमधील परिस्थितीवरून टीकास्त्र!

तुमचे वडील हे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार आणि प्रेरणा होते. त्यांचे मार्गदर्शन आणि मूल्ये तुमच्या व्यक्तिमत्त्वात आणि कलाक्षेत्रातील तुमच्या यशात स्पष्टपणे दिसतात. त्यांच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्याचे दुःख शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. आज रवी टंडन हे शारीरिकदृष्ट्या या जगात नाहीत. पण त्यांच्याकडून मिळालेले शिक्षण आणि जीवनमूल्ये सदैव कुटुंबासोबत राहतील.

मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या दिवंगत आत्म्याला शांती देवो. तसेच शोकाकुल कुटुंबीयांना आणि हितचिंतकांना हे नुकसान सहन करण्यासाठी धीर आणि धैर्य देवो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात लिहिले आहे.

“हा तो दिवस आहे जेव्हा…”, वडिलांच्या तेराव्याला जुने फोटो शेअर करत रवीना टंडन झाली भावूक

दरम्यान रवीना टंडनने तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी सोशल मीडियाद्वारे दिली होती. ११ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. रवीनाने तिच्या वडिलांसोबतचे तिचे बालपणीचे फोटो शेअर करत ही दुख:द बातमी दिली होती.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …