Maharashtra Politics: ‘अशा घटना घडू नये म्हणून…’; Sharddha Walker प्रकरणावर चित्रा वाघ यांनी दिली प्रतिक्रिया

पराग ढोबाळे, झी मीडिया, नागपूर: 18 वर्षीय मुलींना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार (18 years old Young Girls) असला तरी त्यांना विनंती आहे की अशा पद्धतीने चुकीचा (Chitra Wagh) निर्णय घेऊ नये, अशी विनंती भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. दिल्लीतील हत्याकांड (Delhi Shraddha Walker Murder Case) अंगावर काटा आणणार आहे. त्यामुळे त्या आरोपीला त्वरित फाशी झालीच पाहिजे. पण यासोबतच अशा घटना घडू नये यासाठी उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) धर्तीवर लव्ह जिहादचा कायदा सुद्धा आला पाहिजे ही आता काळाची गरज झाली असल्याचे चित्र वाघ पत्रकार परिषदेत म्हणाल्या आहेत. त्या नागपूरच्या प्रेया क्लब येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. (Politician chitra wagh expresses her opinions on sharddha walker case jitendra awhad and rahul gandhi)

राहूल गांधीवर बरसल्या : 

जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Swatantryaveer Savarkar) अपमान करतात त्यांच्यासोबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे कुटुंबीय कसे काय जाऊ शकतात. हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान आहे. एका बाजूला सावरकरांसाठी भारतरत्नची (Bharat Ratna) मागणी करायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा सतत अपमान करणाऱ्या काँग्रेसचे (Congress) हात बळकट करण्याचे काम उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांची पक्ष करत आहे. संजय राठोडबद्दल (Sanjay Rathore) मी माझी भूमिका बदलेली नाही. संजय राठोड यांचा राजीनामा मागणार आहे. मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती दुर्दैवी आहे, मी माझी भूमिका बदलली नाही. मला अनेक जिल्ह्यात या संदर्भात प्रश्न विचारले जातात.  

हेही वाचा :  Smartphone मध्ये अचानक 'असे' बदल दिसत असतील तर व्हा अलर्ट, Hacking ची दाट शक्यता

हेही वाचा – Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा

श्रद्धा वालकर केसवर प्रतिक्रिया : 

त्या संदर्भात माझी न्यायालयीन लढाई चालू आहे. त्यात लपवण्यासारखा काहीच नाही. चित्रा वाघ विरुद्ध महाराष्ट्र शासन अशी माझी लढाई सुरू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे न्यायप्रविष्ट प्रकरणावर फार काही बोलू नये हे अपेक्षित आहे. मी माझी लढाई सोडलेली नाही. ती मुलगी माझी कोणीच लागत नव्हती, ती माझी रक्ताची ही नव्हती. माझ्या जातीची नव्हती. मात्र मी तिच्यासाठी लढले. तेव्हा मला साथ द्यायला कोणी आला नाही. मी अजूनही केस परत घेतलेली नाही. दिल्लीची ही अतिशय वाईट घटना आहे. ज्या मुलीने प्रेम केलं, त्याच्यावर विश्वास ठेवला, तिचा विश्वासघात करून तिचे 35 तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले. अठरा वर्षावरील मुलींना आपले निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र माझी त्या मुलींना विनंती आहे की असे चुकीचे निर्णय घेऊ नका. कुठेतरी सोशल मीडियावर (Social Media) तुमची ओळख होते आणि नंतर असे परिणाम होतात. हे प्रकरण आपण सगळ्यांसाठी एका धडा आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशी दिली पाहिजे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर लव्ह जिहाद सारखा कायदा महाराष्ट्रात होणे ही काळाची गरज आहे. आज आपल्याकडे तसा कायदा नाही भविष्यात तो कायदा झाला पाहिजे, असेही चित्रा वाघ म्हणाल्यात.

हेही वाचा :  बिहारमध्ये आजच राजकीय भूकंप, नितीश कुमार राजीनामा देणार?; असा असेल नव्या सरकारचा प्लान

हेही वाचा – पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल

जितेंद्र आव्हाड प्रतिक्रिया : 

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) तुम्ही काही ही कारण नसताना अनंत करमुसे प्रकरणात माझ्या कुटुंबाला ओढलं होतं. आव्हाड तुम्ही संविधानाचा सन्मान केल्याचा दावा करता. माझ्याबद्दल असं झालं असतं तर मी पोलीस तक्रार (Police) केली असती. बंगल्यात नेऊन मारहाण केली नसती. त्या प्रकरणात मी तुम्हाला बोलले होते, त्यामुळे तुम्ही मला उत्तर द्यायला हवं होतं, कशाला माझ्या कुटुंबाला त्यात ओढलं. ज्या करमुसे बद्दल आव्हाड बोलतात, त्याबद्दल राष्ट्रवादीचा ठाणे (Thane) शहर अध्यक्ष माफी मागतो त्यामुळे आव्हाड यांनी तुमच्या घरात काय घडत आहे हे पहावं असाही सल्ला दिला. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं….

Monsoon Updates : मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसापेक्षा उन्हाळी वातावरणाचीच जाणीव झाल्याचं पाहायला …

भारतीयांची स्वप्नपूर्ती! ढगांवर तरंगणाऱ्या चिनाब पुलावर रेल्वेची यशस्वी ट्रायल; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Chenab Railway Bridge : कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न आता साकार होणार आहे. जगातील सर्वात उंच ब्रिज …