‘द काश्मीर फाईल्स’ पाहिल्यावर कंगनाने पुन्हा साधला बॉलिवूडवर निशाणा, म्हणाली “…त्यांची वेळ आता संपली” | Kangana Ranaut criticises Bollywood pin drop silence on The Kashmir Files Chamche are in shock nrp 97

कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिला हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे.

कंगना रणौतला सिनेसृष्टीत दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. तिने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक उत्तम भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडमध्ये आपले नशिब आजमावण्यासाठी आलेल्या कंगना रणौतला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. काही दिवसांपूर्वी कंगनाने अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाबद्दल वक्तव्य केले होते. त्यानंतर आता कंगनाने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर भाष्य केले आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. अभिनेत्री कंगना रणौतने हा चित्रपट पाहिल्यानतंर त्याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिला हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे.

कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ‘द काश्मीर फाईल्स’साठी मिळालेले रेटिंग शेअर केले आहे. त्यासोबत ती म्हणाली की, “द काश्मीर फाईल्सबाबत सिनेसृष्टीत प्रचंड शांतता आहे. या शांततेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या चित्रपटाची कथा तसेच त्याची कमाई ही फारच उत्कृष्ट आहे. या चित्रपटाची गुंतवणूक आणि नफा ही भविष्यात एक केस स्टडी असू शकते. तसेच हा वर्षातील सर्वात यशस्वी आणि फायदेशीर चित्रपट ठरेल.”

हेही वाचा :  Aamir Khan Dangal : कोट्यवधींची कमाई करणाऱ्या आमिर खानच्या 'दंगल'ला सहा वर्ष पूर्ण

“करोना महामारीनंतर चित्रपटगृहे ही फक्त बिग बजेट चित्रपटांसाठी किंवा फक्त व्हीएफएक्ससाठी उरली होती, अशी समज निर्माण झाली होती. पण या चित्रपटाने हे समज चुकीचे ठरवले. हा चित्रपट सर्व समज गैरसमज चुकीचे ठरवत प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटागृहाकडे आकर्षित करत आहे”, असेही कंगनाने सांगितले.

“अनेक चित्रपटगृहात सकाळी ६ चे शो ही हाऊसफुल्ल असल्याचे दिसत आहे. हे सर्व अविश्वसनीय आहे. Bullydawood आणि त्यांच्या चमच्यांना एक धक्काच बसला आहे. त्यांनी एक चकार शब्दही काढलेला नाही. आज संपूर्ण जग त्याच्याकडे पाहत आहे, पण तरीही त्यांनी एक शब्दही याबद्दल सांगितलेला नाही. त्यांची वेळ आता संपली आहे”, असे कंगना म्हणाली.

“…अन् उरलं सुरलं अवसान गळून गेलं”, गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या अभिनेत्री जुई गडकरीची पोस्ट चर्चेत

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा :  अजय देवगणच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'सिंघम अगेन' येणार प्रेक्षकांच्या भेटीसSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video : ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी…’ सी सेक्शन डिलीव्हरीदरम्यान महिलेनं गायलं डोळ्यात अश्रू आणणारं भजन

C section delivery Viral Video : आई… या शब्दाची फोड करताना आ म्हणजे आत्मा आणि …

‘मोदी सरकारच्या काळात रेल्वे अपघातांमध्ये 1.5 लाख प्रवाशांनी जीव गमावला, याला जबाबदार कोण?’

Railway Accidents During Modi Government Rule: “मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे. …