HSC Exam 2022: बोर्डाचाच चुकला पॅटर्न; इंग्रजीच्या पेपरने निर्माण केला विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे संचालित इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवारी सुरू झाली. पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये चुका आढळल्याची तक्रार विद्यार्थी, शिक्षकांनी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने शिकविलेल्या पॅटर्नच्या विपरीत प्रश्न आले. बोर्डाच्या या चुकलेल्या पॅटर्नमुळे विद्यार्थी चपापले. मुख्य म्हणजे या संभ्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना साडेतीन तासांचा वेळदेखील अपुरा पडला.

गेल्यावर्षी करोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, यावर्षी शिक्षण मंडळाने ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यानुसार, शुक्रवारपासून बारावीची परीक्षा सुरू झाली. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास पेपर हाती आल्यावर त्यात अनेक चुका असल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर कसा सोडवावा, असा प्रश्न पडला. बोर्डाने दिलेल्या सूचना आणि प्रश्नपत्रिका प्रशिक्षणानुसार व्याकरणाच्या प्रश्नांना पर्याय देण्यात आला नाही. मुलाखतीच्या प्रश्नासाठी टेबल आवश्यक असताना तो दिला नव्हता, ‘सिम्पल सेंटेन्स’ बनवा या प्रश्नासाठी देण्यात आलेले वाक्य मुळातच सिम्पल होते. प्रश्नाचे उत्तर असल्याने विद्यार्थी अक्षरश: चक्रावले. अपील लिहिण्याच्या सूचना अपूर्ण असल्याने त्या विद्यार्थ्यांना समजू शकल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी ‘बोर्डाच्या पॅटर्ननुसार पेपर पुन्हा घेण्यात यावा’, अशी मागणी केली असून बोर्डाने याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिली नाही. परीक्षेच्या पहिल्या दिवशी परीक्षेसाठी विभागातून १ लाख ६० हजार ५१९ विद्यार्थ्यांची नोंदणी असून पहिल्या दिवशी १ लाख ३२ हजार विद्यार्थी पेपरला हजर होते. नागपूर विभागातून गडचिरोली येथे कॉपीचे एक प्रकरण आढळले. कोव्हिड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत सर्व विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करणे अनिवार्य होते. काही ठिकाणी याचे पालन झाले तर काही शाळांमध्ये उल्लंघन झाले. त्याशिवाय विद्यार्थ्यांनीदेखील स्वत:सोबत सॅनिटायजर आणले नसल्याचे दिसून आले.

हेही वाचा :  एक्सपोर्ट क्रेडिट गँरंटी कॉरपोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदांची भरती

प्रश्नपेढीच्या विपरीत प्रश्नपत्रिका

गेल्यावर्षी बारावीचा पेपर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे गेल्यावर्षी तयार करण्यात आलेली प्रश्नपत्रिका जशीच्या तशी देण्यात आली. यंदा एक प्रश्नपेढी तयार करण्यात आली होती. त्यातील त्यातील प्रश्नांच्या आधारावर पेपर तयार करायचा होता. तशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. मात्र, त्याच्या विपरीत प्रश्नपत्रिका देण्यात आली.

ICSE बोर्डाकडून दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १० मिनिटांचा वेळ

अशा आहेत चुका

– प्रश्न १मधील ए-५मध्ये दोन सेन्टेन्स सिम्पल करायचे होते. त्यात पहिले वाक्य ‘सिम्पल’ होते, तेच ‘सिम्पल करा’ असे सांगण्यात आले.

– प्रश्न क्रमांक ‘२ सी’मध्ये ‘माइंड मॅपिंग’ आणि प्रश्न क्रमांक ४ ‘सी’ ‘एक्स्पान्शन ऑफ आयडिया’ दोन्ही प्रश्नांचा विषय एकच असल्याचे दिसून आले.

– प्रश्न क्रमांक ३मधील कवितेवर आधारित प्रश्न आकलनापलीकडील होता.

– प्रश्न क्रमांक ४मधील ‘डी’ यातील ‘अपील रायटिंग’ हा प्रश्न अपूर्ण होता.

– प्रश्न क्रमांक ४मधील ‘बी’ यामध्ये देण्यात आलेल्या ‘इंटरव्ह्यू’मध्ये बोर्डाच्या निर्देशाप्रमाणे ‘टेबल फॉरमॅट’ नव्हता.

– प्रश्न क्रमांक ५मध्ये नॉव्हेलमधील सर्व प्रश्न विद्यापीठस्तरीय होते. विशेष म्हणजे, त्याचा ठराविक भाग अभ्यासक्रमात दिला असताना प्रश्न मात्र संपूर्ण नॉव्हेलवर विचारण्यात आला.

हेही वाचा :  राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती

SSC HSC Exam 2022: परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न? बोर्डाच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना दिला ‘हा’ दिलासा
जेईई मेन आणि बोर्डाच्या परीक्षा क्लॅश, विद्यार्थ्यांकडून तारखा पुढे ढकलण्याची मागणी
CTET परीक्षा २०२१ निकाल कधी? जाणून घ्या नवीन अपडेट

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …