ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये तरुणांना नोकरीची संधी

Oil India Limited Recruitment 2022: ऑइल इंडिया लिमिटेडने(Oil India Limited) वॉर्डन (Warden) आणि केमिकल असिस्टंट (Chemical Assistant) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या अंतर्गत एकूण २८ पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यामध्ये वॉर्डन महिलांच्या ३ आणि केमिकल असिस्टंटच्या २५ पदांचा समावेश आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या तारखा

वॉर्डन (महिला) पदांसाठी नोंदणीची तारीख आणि वेळ – ०८ मार्च २०२२ (सकाळी ७:०० ते सकाळी ११:००)

केमिकल असिस्टंट पदांसाठी नोंदणीची तारीख आणि वेळ – १५ मार्च २०२२ (सकाळी ७:०० ते ११:००)

ऑइल इंडिया लिमिटेडने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, या नियुक्त्या विशिष्ट कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्टवर केल्या जाणार आहेत. वॉर्डन महिला पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांकडे होमसायन्समध्ये बीएससी पदवी किंवा हाउसकीपिंग/केटरिंगमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तर केमिकल असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बीएससीमध्ये रसायनशास्त्र विषय असणे बंधनकारक आहे.

RBI Recruitment: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

हेही वाचा :  महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी https://www.oil-india.com/ वर जाऊ शकतात. उमेदवारांनी संपूर्ण नोटिफिकेशन तपासून त्यानुसार अर्ज करायचा आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख पदानुसार वेगळी आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Government Job: ओएनजीसीमध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ करा अर्ज
वॉर्डन पदासाठी अर्ज करणारे उमेदवार ८ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. तर केमिकल असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १५ मार्च २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

HSL Recruitment 2022: संरक्षण मंत्रालयाअंतर्गत विविध पदांची भरती
फिल्मसिटीमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या तपशील

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …