मधुमेह, उच्च रक्तदाबाला घरचं जेवणच जबाबदार, किचनमध्येच दबा धरून बसलेत शत्रू

घरी शिजवलेले अन्न खाणाऱ्या लोकांचा गैरसमज असतो की, ते जंक फूड खात नाहीत म्हणजे ते निरोगी आहेत. मात्र हे अजिबात खरं नाही. तुमच्या स्वयंपाकघरात आढळणारे सर्व घटक आणि घरी शिजवलेले पदार्थ पूर्णपणे आरोग्यदायी आणि जोखीममुक्त आहेत का? हे तपासून घेणे गरजेचे आहे.

अशा अनेक वस्तू आहेत ज्यांचा साठा आपण करून ठेवतो आणि त्याचा पदार्थ शिजवण्यासाठी उपयोग करतो. विशेषत: जर तुम्ही त्यांचा जास्त वापर करत असाल तर, त्याबाबत पुनर्विचार करायला लागेल. जाणून घेऊया कोणते आहेत ते पदार्थ जे आरोग्याला हानी पोचवू शकतात. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​साखर

पांढर्‍या स्फटिकांनी भरलेली साखरेची बरणी जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात आढळते. ही गोड साखर चहा, कॉफी, मिल्कशेक आणि इतर पाककृतींमध्ये आपण वापरतो. जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब, जळजळ, वजन वाढणे, मधुमेह आणि फॅटी लिव्हर रोग होऊ शकतात. पुढे, या सर्व परिस्थितींमुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

​रिफाइंड पीठ

त्याला मैदा असेही म्हणतात, तुमच्या स्वयंपाकघरात त्याचा समावेश असतो, तसेच तुमच्या स्वयंपाकघरातील कुकीज, केक, तृणधान्ये, ब्रेड आणि पास्तामध्ये देखील वापर करतात. मैद्याचे जास्त सेवन वजन वाढणे, चयापचय समस्या, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि कर्करोगाचा धोका निर्माण करते. इतकेच काय, रिफायनिंग प्रक्रियेमुळे आहारातील फायबर, बी जीवनसत्त्वे, लोह, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ई ची देखील मोठी हानी होते.

हेही वाचा :  Crying makeup पासून Dark lip liner पर्यंत, हे 2022 मधील टॉप ब्युटी ट्रेंड

​मीठ

मिठाचे जास्त सेवन उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि पक्षाघाताचा धोका वाढवते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, बहुतेक लोक खूप जास्त मीठ वापरतात – दररोज सरासरी ०९-१२ ग्रॅम, किंवा शिफारस केलेल्या कमाल पातळीच्या दुप्पट मिठाचा वापर करतात. सोडियमचे सेवन कमी केल्यास मृत्यू टाळता येतो.

​तेल

तुमच्या घरातील लोकांना पकोडे, तळलेल्या कांद्याच्या रिंग्ज, फ्रेंच फ्राईज, फ्रोझन पदार्थ इत्यादी खायला आवडतात का? या प्रश्नांचे उत्तरे हो असल्यास, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, स्तन/अंडाशयाचा कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, वजन वाढणे आणि सांधेदुखीचा धोका वाढतो.

​​मुख्य मुद्दा

तब्येतीला नुकसान होईल म्हणून मीठ किंवा इतर कोणतेही खाद्यपदार्थ अचानक खाणे थांबवू नये. त्याऐवजी, आरोग्यदायी पर्यायांवर लक्ष केंद्रित करणे आणि हे पदार्थ केवळ मर्यादित प्रमाणात सेवन करणे ही मुख्य गोष्ट आहे. उदाहरणार्थ, नाचणी किंवा संपूर्ण गहू यांसारख्या आरोग्यदायी आणि फायबर-समृद्ध पीठांचा मैद्याऐवजी वापर करा. साखरेऐवजी गुळाचा वापर करा. हे छोटे बदल तुमचे आरोग्य तसेच तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारण्यात खूप मदत करू शकतात.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …