ऋजुता दिवेकरने सांगितल्या प्रवासातील ४ बेस्ट टिप्स, यामुळे तुमचा प्रवास होईल अधिक सुखकर

प्रवास हा माणसाला समृद्ध करत असतो. पण या प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी तुमचं आरोग्य देखील तितकंच उत्तम असणे गरजेचे असते. अनेकजण आनंदासाठी, निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी प्रवास करतात. तर काही जण कामाचा भाग म्हणून प्रवास करतात. पण या प्रवासात काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहेत.

प्रवासातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं आरोग्य. प्रवास करताना आरोग्याची काळजी विशेष घ्यायला हवी. असं करत असताना तुम्ही न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने दिलेल्या महत्वाच्या टिप्स आवर्जून पाळल्या पाहिजेत. यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. (फोटो सौजन्य – istock)

​प्रवासात भरपूर पाणी प्या

प्रवास हा कायमच दमवणारा असतो. अशामुळे प्रवासात तुम्ही कायमच स्वतःला हायड्रेड ठेवणे गरजेचे असते. अशावेळी स्वतःची बाटली कॅरी करा. सतत पाणीसोबत कसं राहिल याची काळजी घ्या.. तसेच प्रवासात डोकेदुखी किंवा थकवा येण्याची दाट शक्यता असते. अशावेळी भरपूर पाणी प्या.

(वाचा – Fruits for Diabetes : ५ फळं खाऊन कंट्रोलमध्ये ठेवा डायबिटिज, इतर आजारांपासूनही होईल सुटका)

हेही वाचा :  तिसऱ्या महायुद्धाबाबत फ्रान्सच्या या तज्ज्ञाची भविष्यवाणी खरी ठरली?

​चहा -कॉफी टाळा

प्रवासात दगदग होते. अशावेळी चहा-कॉफी टाळा. तसेच विमानाने प्रवास करत असताना बोर्डिंगच्या ६० मिनिटे आधी आणि लँडिंगनंतर ६० मिनिटे चहा-कॉफी टाळा. तसेच रोड प्रवास करत असाल तेव्हा देखील चहा-कॉफी कटाक्षाने टाळा. रोड प्रवास करत असताना झोप लागू नये म्हणून कॅफिनचे सेवन केले जाते. मात्र हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही.

(Gut Health : हेल्दी जेवणच बद्धकोष्ठता आणि अपचनाला जबाबदार, आठवणीने खा ५ प्रीबायोटिक फूड्स)

ऋजुता दिवेकर हेल्थ टिप्स

​सूर्यनमस्कार आवर्जून करा

प्रवास करत असताना बऱ्याचदा तुम्ही मोकळी हवा अनुभवता. या वातावरणात न चुकता ५ सूर्यनमस्कार तरी कराच. तसेच तुम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत असाल तेथे जिम आहे का किंवा योगा मॅट उपलब्ध होईल का ते पाहा. तसेच झोपताना रात्री ५ मिनिटे तरी सुप्तबध्द कोणासनात राहा.

(वाचा – ऋजुता दिवेकरने सांगितले 5 एनर्जी बूस्टर फूड, इम्युनिटी पॉवरसाठी सगळ्यात बेस्ट)

​प्रवासात कसा असावा आहार?

प्रवासात असताना हॉटेलमधून बाहेर पडताना खिचडी, डाळ भात, पास्ता किंवा योग्य जेवण करून निघा. सकाळी कुठेतरी जाण्यापूर्वी रात्रीसाठी हॉटेलमध्ये खिचडी, डाळ भात, पास्ता इत्यादी ऑर्डर करा आणि रात्री येण्याची संभाव्य वेळ सांगून निघा. ज्यामुळे तुमचे पोट ठीक होईल. त्याचबरोबर वाटेत फराळ म्हणून शेंगदाणे, काजू आणि पास्ता खाऊ शकता, असं ऋजुता दिवेकर सांगतात.

हेही वाचा :  स्मार्टफोनला तासाऐवजी मिनिटात करा चार्ज, या टिप्सचा करा वापर

(वाचा – How to Reduce Blood Sugar in 15 Days: आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं खास चूर्ण, १५ दिवसांत कमी होणार ब्लड शुगर))



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …