Frozen Foods Disadvantages : दररोज फ्रिजमध्ये ठेवलेलं ‘विष’ खाताय, सुदृढ आरोग्यासाठी आजच मोडा ही सवय

Side Effects of Eating Frozen Food: हल्ली प्रत्येकजण ऑफिस, घर आणि वेळ खाऊ प्रवास यामध्ये अडकत चालला आहे. अशावेळी सर्रास फ्रोझन फूडचा वापर केला जातो. या धावपळीच्या दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांच्याच खाण्याच्या सवयी बदलत चालल्या आहेत. आपण हल्ली सगळ्याच गोष्टी फ्रिजमध्ये ठेवतो. अगदी बाजारातून ताजी खरेदी केलेली भाजी देखील फ्रिजमध्ये ठेवली जाते. पण फ्रिजमधील या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरात हळूहळू विष पसरवत आहे. हे विष तुमच्या शरीरातील प्रत्येक नस आणि नस खराब करते.

फ्रीजमध्ये कोणते ‘विष’ आहे? आरोग्य तज्ञ गोठवलेले अन्न किंवा फ्रिजमधील प्रत्येक पदार्थ विषासारखे हानिकारक असल्याच सांगितलं आहे. जे शरीरासाठी ‘सायलेंट किलर’सारखे काम करते. तुमच्या फ्रीजमध्ये मांस, वाटाणे किंवा भाज्या असल्यास, त्यांना ताबडतोब घराबाहेर काढा. कारण हे विषासमान आहे.

​ब्लड प्रेशर होतो हाय

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, सुमारे 70 टक्के सोडियम प्रक्रिया केलेल्या आणि फ्रोझन जेवणासारख्या पॅक केलेल्या पदार्थांमधून येते. जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तदाब धोक्याच्या चिन्हापेक्षा जास्त वाढू शकतो. यामुळे स्ट्रोक आणि हृदयरोगाचा धोका अधिक आहे.

हेही वाचा :  काहीही खाताना - पिताना लिपस्टिक निघून जाते मग फॉलो करा या सिपल ट्रिक

(वाचा – Guava For Cholesterol : घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी करतोय पेरू, नसा साफ होण्यासाठी ठरतोय वरदान)

​नसा होतील खराब

फ्रोजन पिझ्झा-बर्गरमध्ये हायड्रोजनेटेड तेल असू शकते, जे प्रत्येक मज्जातंतूला नुकसान पोहोचवू शकते. हे तेल गोठलेले अन्न घट्ट आणि कडक बनवण्यासाठी वापरले जाते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, या तेलामध्ये ट्रान्स फॅट्स असतात. ज्यामुळे नसांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

(वाचा – Food For Constipation: जुन्यातील जुना बद्धकोष्ठतेचा समूळ नाश करतील हे ६ पदार्थ, आतड्यांमधली घाण काढून टाकतील)

​सारख डोकं दुखणे

फ्रोझन फूडमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट असते, ज्याला एमएसजी असेही म्हणतात. चायनीज फूडमध्येही हा घटक आढळतो. एनसीबीआयच्या अभ्यासानुसार, एमएसजीच्या सेवनामुळे डोकेदुखी, घाम येणे, पोटदुखी यासारख्या समस्या वारंवार उद्भवतात.

(वाचा – Causes of Belly Fat: दररोज पोटावरची चरबी वाढतेय, शर्टच्या बटनातून ढेरी डोकावतेय? तुमच्या ७ चुकाच याला कारणीभूत)

​मसल्स होतील डॅमेज

बहुतेक थंड पदार्थांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे नसतात. त्यामुळे स्नायूंना इजा होऊ लागते. जेव्हा शरीराला अन्नातून पोषण मिळत नाही. तेव्हा ते तुमच्या स्नायूंमधून पोषकतत्वे हिसकावून घेण्यास सुरुवात करते.

हेही वाचा :  Hair Loss : पुरुषांच्या 6 गंभीर चुकांमुळे केस गळतात, कमी वयातच पडते टक्कल

(वाचा – Juice For Weight Loss : लठ्ठपणामुळे सगळीकडून लोंबकळते चरबी, या ५ ज्यूसने झपाट्याने कमी होईल वजन))

​कायम उदास वाटेल

एका क्लिनिकल अभ्यासानुसार, जे लोक स्वतःचे अन्न स्वतः शिजवतात ते अधिक आनंदी असतात. कारण, स्वयंपाक हा नैसर्गिक ताणतणाव आहे. पण फ्रोझन फूड तुम्हाला स्वयंपाक करण्याची सोय देत नाही आणि हा फायदा हिरावून घेतो.

(वाचा – Weak Heart Sign : हृदय कमजोर होताच दातांमध्ये दिसतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या ५ महत्वाच्या गोष्टी))

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …