Twitter बदललंय; आजपासून तुमच्यावर होणार थेट परिणाम, एका क्लिकवर जाणून घ्या

Elon Musk Calls Twitter: एलोन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीच्या ट्विटरमध्ये गेल्या काही दिवसात अनेक बदल होत आहेत. जर तुम्हीही ट्विटर युजर्स (Twitter Users) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आजपासून (12 December)ट्विटवरील ब्लू टिक सबस्क्रिप्शन सुरु होणार आहे. यासोबतच ट्विट एडिट बटणासह इतर फिचर्सही लाँच करण्याची शक्यता आहे. 

दरम्यान ट्विटर पुन्हा एकदा आपल्या यूजर्ससाठी ब्लू सब्सक्रिप्शन (Blue Subscription) पॅकेज लॉन्च करणार आहे. ही सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर युजर्स पैसे भरून ब्लू टिक (Twitter Blue Tick) मिळवू शकतील. यासोबतच कंटेंट एडिट व्यतिरिक्त त्यांना इतरही अनेक सुविधा मिळणार आहेत. मात्र, अॅपल आयओएस वापरकर्त्यांसाठी ही सेवा महागणार आहे. 

याबाबत ट्विटर कंपनीने सांगितलं की, ट्विटर सोमवारी 12 डिसेंबरला ब्लू टिक सेवा पुन्हा सुरु करणार आहे. या सेवेसाठी दरमहा आठ डॉलर (सुमारे 659 रुपये) शुल्क आकारण्यात येईल. दरम्यान अँड्रॉईड (Android) युजर्सच्या तुलनेत आयफोन युजर्ससाठी (iOS User) ब्लू टिक सेवा महाग असणार आहे. आयफोन (iPhone) युजर्ससाठी ब्लू टिक सबस्क्रिप्शनसाठी दरमहा 11 डॉलर (सुमारे 907 रुपये) शुल्क आकारण्यात येणार आहे.  

हेही वाचा :  WhatsApp Users सावधान! व्हॉट्सअॅपचे मेसेज इतर कोणी तरी वाचतयं? लगेच चेक करा ही सेटिंग

वाचा: ‘या’ शाळांना 121 दिवस सुट्टी, वर्षातून फक्त 229 दिवसंच अभ्यास होणार! 

फोटो किंवा नाव बदलल्यानंतर ब्लू टिक काढली जाईल

ट्विटर युजर्सने त्यांच्या प्रोफाईलवरील नाव किंवा फोटो बदलल्यास त्यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिक काढून टाकण्यात येईल. मात्र, पुन्हा पडताळणी केल्यानंतर पुन्हा युजरला ब्लू टिक मिळेल. यासोबतच ट्विटरने वाढती स्पर्धा पाहता आणखी काही फिचर जोडण्याची संकल्पा आखली आहे. यानुसार, आता तुम्हांला इंस्टाग्राम आणि फेसबुकप्रमाणे ट्विटरवरही कंटेंट शेअर करता येणार आहे. यानुसार, तुम्ही ट्विटवर 1080p पर्यंतचे व्हिडिओ देखील अपलोड करू शकाल. 

अधिकृत ट्विटर अकाऊंटने माहिती देताना म्हटले आहे की, “सदस्य त्यांचे हँडल, डिस्प्ले नाव किंवा प्रोफाइल फोटो बदलू शकतील, परंतु त्यांनी तसे केल्यास त्यांची ब्लू टिक (Twitter Blue Tick) तात्पुरती काढून टाकली जाईल आणि त्यांचे खाते पुन्हा सत्यापित केले जाईल.”

ब्लू, ग्रे आणि गोल्डन टिकचा असणार पर्याय

ट्विटरवरील ब्लू टिकसाठी (Blue Tick) वेगवेगळे पर्याय देण्यात येणार आहेत. अधिकृत तसेच सरकारी ट्विटर अकाऊंटसाठी राखाडी रंगाचा (Grey) ऑफिशियल टॅग (Official Tag) देण्यात येईल. कंपनी किंवा ग्रुपच्या अकाऊंटसाठी ट्विटर अकाऊंटसाठी सोनेरी रंगाची टिक (Golden Tick) देण्यात येईल. ब्लू टिक सबस्क्रिप्शनसाठी दरमहा आठ डॉलर शुल्क आकारण्यात येईल. 

हेही वाचा :  Weather and Rain Update : थंडीचे वाजले बारा; 'या' 10 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …