सिद्धार्थची कियारावरून नजरच हटेना, कियारा म्हणतेय काहीतरी वेगळी अशी विशेष होती ती रात्र

कियारा आणि सिद्धार्थने जैसलमेरमध्ये सूर्यगढ येथे ७ फेब्रुवारीला लग्न केले. गेल्या अनेक दिवसांपासून या जोडीचे फोटो व्हायरल होत आहेत. आता कियाराने सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि तिच्या संगीत नाईट्सचे फोटो शेअरे केले असून तेदेखील व्हायरल झाले आहेत. मनिष मल्होत्राने डिझाईन केलेल्या या गोल्डन रंगाच्या लेहंग्यामध्ये कियारा अत्यंत सुंदर दिसत असून सिद्धार्थचीही नजर तिच्यावरून हटत नाहीये. पाहूया कियाराचा हा लुक कसा होता. (फोटो सौजन्य – @kiaraaliaadvani Instagram)

​असा होता कियारा – सिद्धार्थचा लुक​

​असा होता कियारा - सिद्धार्थचा लुक​

डिझाईनर मनिष मल्होत्राने सिद्धार्थ आणि कियारासाठी खास कस्टम डिझाईन केले असल्याचे दिसून आले. संगीत नाईटसाठी अत्यंत लॅव्हिश असा गोल्डन लेहंगा कियाराने परिधान केला असून सिद्धार्थने ब्लॅक, गोल्ड आणि एम्ब्रॉईडेड शेरवानी घातल्याचे दिसून येत आहे. दोघांवरूनही नजर हटत नाहीये. कियाराने कॅप्शनमध्ये ‘काहीतरी वेगळं असं त्या रात्रीबाबत, काहीतरी स्पेशल’ अशी कॅप्शन देत फोटो शेअर केले आहेत.

​कियाराचा गोल्डन लेहंगा लुक​

​कियाराचा गोल्डन लेहंगा लुक​

प्लजिंग व्ही नेकलाईन, फुल लेंथ स्लीव्ह्ज, बॅक रिव्हिलिंग डिझाईन आणि त्यावर शिमर वर्क, टसल्स आणि हेव्ही एम्ब्रॉयडरी असणारा असा हा गोल्डन लेहंगा घातला होता. अत्यंत लक्षवेधी असा हा लेहंगा संगीत नाईट्ससाठी खास बनवून घेण्यात आला होता. लेहंगा चोली असा हा कियाराचा लुक अत्यंत आकर्षक आणि पाहातच राहण्यासारखा आहे.
(वाचा – दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात रेखाचा बोलबाला, ‘मलमली तारूण्य’ म्हणावे असे आरस्पानी सौंदर्य, आलिया पडली फिकी)

हेही वाचा :  कियारा आणि सिद्धार्थच्या शाही विवाहसोहळ्याकडे चाहत्यांचं लक्ष

​कियाराचे हिऱ्याचे दागिने​

​कियाराचे हिऱ्याचे दागिने​

कियाराने लग्नापासून अगदी प्रत्येक फंक्शनला खास आणि वेगळे दागिने घातल्याचे दिसून आले आहे. संगीत नाईटलादेखील कियाराने हेव्ही गोल्ड गाऊनसह हिऱ्याचा नेकलेस घातला होता ज्यामध्ये रूबीचा खडा उठावदार दिसत होता. तर हातात हिऱ्याची अंगठी घालून तिने लुक पूर्ण केला होता.

(वाचा – सैराट झालं जी…रिंकूच्या देशी लुकवर चाहते फिदा, म्हणतात इन्स्टाग्रामची क्वीन)

​न्यूड मेकअपने केला लुक पूर्ण​

​न्यूड मेकअपने केला लुक पूर्ण​

कियाराने अत्यंत सुंदर नैसर्गिक मेकअप लुक ठेवला असून शिमरिंग आयशॅडो, विंग्ड आयलायनर, न्यूड लिप शेड आणि ब्लश्ड ग्लोईंग स्किन अशा पद्धतीचा मेकअप यावेळी निवडला. तर हेअरस्टाईल करताना तिने एका बाजूला भांग पाडत Wavy Tresses ठेवले होते, जे तिच्या सौंदर्यात अधिक भर पाडत होते.

(वाचा – ‘प्रेमाच्या रंगात न्हाऊनी’…हार्दिक आणि नताशाचा हळदी – मेहंदीचा लुक, नजर ना लगे!)

​सिद्धार्थचा बंधगळा लुक​

​सिद्धार्थचा बंधगळा लुक​

दरम्यान सिद्धार्थने नवरीला साजेसे कपडे घातले होते. ब्लॅक पिसस्ट्राईप प्रिंटेड बटन डाऊन कुर्ता आणि फुल स्लीव्ह्ज असा सिद्धार्थचा लुक होता. त्यासह त्याने ब्लॅक बंधगळा जॅकेट घातले होते, ज्यावर गोल्डन फ्लोरल ब्रोकेड एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. पायजमा, ड्रेस शूज आणि साईड पार्टेड स्लीक हेअर असा लुक करून सिद्धार्थ माचो दिसत होता.

हेही वाचा :  कियारा-सिद्धार्थचा शाही थाट; सूर्यगढ पॅलेसमध्ये पार पडणार संगीत सोहळा

कियारा आणि सिद्धार्थच्या या फोटोंकडे पाहून दोघांनीही या पार्टीमध्ये खूप धमाल केली असणार याचा नक्कीच अंदाज लावता येतो.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …