रोज खा ही 10 रू भाजी, शक्ती वाढून झटक्यात होतं पोट साफ व मुळव्याध पळतो 10 हात दूर

मोड आलेले धान्य आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. मोड आलेले मूग, मोड आलेली मेथी, मोड आलेला कांदा, मोड आलेले लसूण, मोड आलेले शेंगदाणे आणि मोड आलेले गहू या सर्वांचा आरोग्याला वेगवेगळ्या प्रकारे फायदा होतो असे मानले जाते. त्याचप्रमाणे मोड आलेले हरभरा देखील पौष्टिकतेच्या बाबतीत कमी नाही. मोड आलेले हरभरे म्हणजे प्रोटिन, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि हेल्दी फॅट्सचा जबरदस्त समृद्ध स्त्रोत आहेत.

फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर तसेच न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियन असणाऱ्या शिखा अग्रवाल शर्मा यांच्या मते, स्प्राउट्समध्ये फायबर, मॅंगनीज, रिबोफ्लेविन, तांबे, प्रोटीन, थायामिन, नियासिन, पॅन्टोथेनिक ऍसिड, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जीवनसत्त्वे ए, बी6 आणि सी असतात. शिवाय पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणात आढळते. चला तर जाणून घेऊया नियमित मोड आलेले हरभरे खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात. (फोटो सौजन्य :- iStock)

हृदय निरोगी ठेवण्यास सहाय्यक

हृदय निरोगी ठेवण्यास सहाय्यक

स्प्राउट्स हे अँटिऑक्सिडंट्स आणि अँथोसायनिन्स तसेच फायटोन्यूट्रिएंट्सचे उत्तम स्रोत आहेत. हेच कारण आहे की त्यांचे नियमित सेवन रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

हेही वाचा :  पोट साफ होण्यासाठी व इम्युनिटी वाढवण्यासाठी औषधासमान आहेत या 5 भाज्या

(वाचा :- Holi Safety Tip: डोळ्यांतलं नाजुकसे बुभूळ फाडून टाकतो काचेचा रंग, डॉ. सांगितले 5 भयंकर नुकसान व बचावासाठी उपाय)​

ब्लड शुगर राहते कंट्रोल

ब्लड शुगर राहते कंट्रोल

मोड आलेल्या हरभऱ्यातील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स हळूहळू पचतात. याशिवाय त्यात विरघळणारे तंतू असतात, जे रक्तातील साखरेचे शोषण कमी करतात. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले हे अन्न रक्तातील साखर वाढण्यास प्रतिबंध करते आणि तुम्हाला जास्त वेळ पोट भरलेले असल्यासारखे वाटते. यामुळे भूक लागत नाही आणि खाण्यावर नियंत्रण सुद्धा राहते.
(वाचा :- सिंहासनामुळे बोबडं बोलणं होईल बंदच, मोत्यासारखे टपाटप येतील शब्द बाहेर, 5 मिनिटांत मिळेल सिंहासारखा करारा आवाज)​

मेंदूची कार्यक्षमता वाढवते

मेंदूची कार्यक्षमता वाढवते

मोड आलेल्या हरभऱ्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 म्हणजेच पायरीडॉक्सिन तसेच कोलीन भरपूर प्रमाणात असते. हरभऱ्याचे हे घटक मेंदूच्या कार्याला चालना देतात, विचार करण्याची क्षमता सुधारतात, स्मरणशक्ती मजबूत करतात आणि एकाग्रता सुधारतात.
(वाचा :- Mental Health Tips : स्ट्रेसमध्ये असाल तर चुकूनही खाऊ नका ‘हे’ 5 पदार्थ, नाहीतर मेंदूची होईल भयंकर अवस्था..!)​

बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यांपासून होतो बचाव

बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यांपासून होतो बचाव

स्प्राउट्समध्ये भरपूर कार्बोहायड्रेट आणि फायबर असतात. कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया निरोगी राहते. यामुळेच याचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि मूळव्याध या आजारापासून बचाव होऊ शकतो.
(वाचा :- Sushmita Sen Attack: हार्ट अटॅकनंतर सुष्मिताच्या नसांमध्ये घातले स्टेंट,नसा ब्लॉक होण्यापासून वाचवतो हा पदार्थ)​

हेही वाचा :  बद्धकोष्ठता आणि गॅसच्या त्रासाने हैराण आहात? बाबा रामदेव यांच्या उपयांनी मिळवा कायमची मुक्ती

स्नायू होतात मजबूत

स्नायू होतात मजबूत

मोड आलेल्या हरभऱ्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते तर प्रथिने जास्त आढळतात. वजन कमी करण्यासाठी आणि कमकुवत लोकांसाठी त्यांच्या स्नायूंना पुनरुज्जीवित करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. मोड आलेल्या हरभऱ्याच्या एका सर्व्हिंगमध्ये सुमारे 10 ग्रॅम प्रथिने आढळतात.
(वाचा :- सायंटिस्टचा दावा – दारू सोडवणारं औषध अखेर सापडलं, दारूकडे ढुंकूनही बघत नाही व्यसनी, हे 5 अवयव करते कॅन्सरमुक्त)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …