बद्धकोष्ठता आणि गॅसच्या त्रासाने हैराण आहात? बाबा रामदेव यांच्या उपयांनी मिळवा कायमची मुक्ती

रोजच्या दिनक्रमात राहणीमान, खाण्यापिण्यापासून, उठण्या-बोलण्यापर्यंतच्या पद्धतीही बदलतात. थंडी या ऋतूमध्ये शरीरातही अनेक बदल दिसून येतात, जे चांगले किंवा वाईट दोन्ही असू शकतात. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे, अशा लोकांना या ऋतूत स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण थोडीशी निष्काळजीपणाही सर्दी होण्याचा धोका वाढवते.

सर्दी सुरू होताच पचनसंस्थेतही समस्या सुरू होतात. हिवाळ्यात भूक जास्त लागते कारण आपल्या शरीराला सर्दी टाळण्यासाठी जास्त कॅलरीजची गरज असते. मात्र, जास्त अन्न खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो, त्यामुळे गॅस, अपचन, उलट्या, बद्धकोष्ठता आदी समस्या उद्भवतात. योगगुरू बाबा रामदेव यांच्या मते, थंडीत पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी योगासनेसोबतच आहारात सुधारणा करून पचनसंस्था सुधारली जाऊ शकते. (फोटो सौजन्य – iStock)

कपालभाती

कपालभाती

कपालभाती प्राणायाम रोज केल्याने गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन या समस्या दूर होतात.
​(वाचा – How to Control Diabetes : किचनमधील या १० गोष्टींनी डायबिटिस ठेवा कंट्रोलमध्ये, आयुर्वेदिक उपाय ठरतोय फायदेशीर)​

पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तानासन केल्याने पोटाच्या सर्व समस्या दूर होतात. बद्धकोष्ठता, अपचन, पोट फुगणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हे आसन केल्याने खूप फायदा होतो. पण ही योगासने नित्यनियमाने केल्यास चांगला फरक जाणवू शकतो.

हेही वाचा :  खातेवाटप होण्याआधीच राष्ट्रवादीच्या 9 मत्र्यांचे बंगल आणि दालनांचे वाटप; मंत्रीमडंळ विस्तार कधी?

​(वाचा – Weight Loss Tips : जिममध्ये कितीही घाम गाळा, हे ५ पदार्थ हद्दपार कराल तर तर वजनाचा काटा सरकेल)​

त्रिकोणासन योग

त्रिकोणासन योग

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर या आसनाद्वारे मात करता येते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन करावे. या आसनाद्वारे पोटाची चरबीही कमी करता येते.

​(वाचा – स्मार्टफोनमुळे ३० वर्षीय महिलेने गमावले डोळे, कसे ते घ्या जाणून)​

पवनमुक्तासन

पवनमुक्तासन

हे आसन रोज सकाळी केल्याने गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. पवनमुक्तासन पोटाचे स्नायू मजबूत करते आणि पचनसंस्था निरोगी ठेवते.

​(वाचा – ५३ वर्षांच्या वयात सलमानची अभिनेत्री भाग्यश्रीची परफेक्ट फिगर, हा असतो खास डाएट)​

चक्की आसन

चक्की आसन

हे आसन पोटाची चरबी कमी करते. चक्की आसनामुळे पोटाची चरबी कमी होते, ज्यामुळे वजन कमी होते आणि शरीर लवचिक बनते. या आसनामुळे पोटातील गॅसही नैसर्गिकरित्या बाहेर पडतो.

​(वाचा – घाणेरड्या कोलेस्ट्रॉलने नसांमध्ये बनवलंय घर? औषधांशिवाय या ५ योगासनांनी फेकून द्या बाहेर)​

पाणी प्या

पाणी प्या

पाणी कमी पिणे ही एक महत्वाची समस्या आहे. हिवाळ्यात तहान कमी लागते तसेच अनेकांना पाणी कमी पिण्याची सवय असते. कमी पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. हिवाळ्यातही जास्त पाणी प्यावे. पाण्याची कमतरता भासू नये.

हेही वाचा :  बड्या हॉलिवूड अभिनेत्रीकडं सापडला गांजा; इतके डॉलर्स दिल्यावर झाली सुटका

​(वाचा – Uric Acid च्या त्रासापासून व्हा कायमचे मुक्त; काय खावे-काय टाळावे जाणून घ्या)​

या पदार्थांच सेवन करा

या पदार्थांच सेवन करा

सकाळी उठल्यानंतर काही ठराविक पदार्थांचे सेवन करा. सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफीऐवजी आवळा, तुळशी, कोरफड, कडुनिंब, हळद, गिलोय यांचा वापर करावा. कधीही उठल्या उठल्या चहा कॉफी घेऊ नका, असे अनेक तज्ज्ञही सांगतात.

​(वाचा – How To Relieve Toothache : दातदुखीसारख्या भयंकर त्रासावर आयुर्वेदिक उपाय, काळे डाग आणि जंतही निघून जातील)​

आहारात महत्वाचे बदल

आहारात महत्वाचे बदल

चहा/कॉफीचे सेवन कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. बहुतेक लोक इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात चहा आणि कॉफीचे सेवन अधिक करतात. असे करणे अजिबात योग्य नाही. चहा किंवा कॉफीऐवजी त्यांनी ग्रीन टी किंवा गरम पाणी वापरावे.

(वाचा – घाणेरडं कोलेस्ट्रॉल मुळापासून उपटून फेकून १०० च्या स्पीडने धावेल रक्त, फक्त दररोज खा १० पदार्थ)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  लॅपटॉपवर स्क्रीनशॉट कसा काढायचा माहितीये? ‘या’ Shortcut Keys चा होईल उपयोग; जाणून घ्या डिटेल्स

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …