केस गळणे थांबवण्यासाठी करा 4 योगाप्रकार, बाबा रामदेव यांनी दिल्या सोप्या टिप्स

बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या केसांवर आणि त्वचेवर दिसून येतो. चुकीच्या आहारामुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे दिवसेंदिवस ही समस्या वाढत आहे. केसगळतीच्या समस्येने केवळ महिलाच नाही तर पुरुषही त्रस्त असतात. यावर उपाय म्हणून आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे, चांगले अन्न खाणे, शक्यतो व्यायाम करणे आवश्यक आहे. पण याशिवाय एक गोष्ट आहे जी खूप प्रभावी ठरू शकते आणि ती म्हणजे योग. मित्रांनो हे वाचून तुम्हाला थोडे नवलच वाटेल पण योगा केल्याने तुमच्या केसांना फायदा होतो. यासाठी बाबा रामदेव यांनी काही काही योगा असने सांगितले आहेत. हे योगा प्रकार तुम्ही कधीही आणि कुठेही ट्राय करु शकता. (फोटो सौजन्य :- @swaamiramdev, istock)

शवासन

शवासन

शवासन हे अगदी सोपे आसन आहे आणि तुम्हाला त्याचे फायदे माहित असलेच पाहिजे आणि त्यापैकी एक म्हणजे केसांना होणारा फायदा. शवासनाने मन आणि शरीर दोन्ही शांत होतात. जेव्हा तुम्हाला विश्रांतीची गरज असते तेव्हा हे आसन केले जाते.

(वाचा :- Hair Fall Solution : ८ दिवसात केसांचं गळणं होईल कमी,घनदाट केसांसाठी Baba Ramdev नी सांगितले खास उपाय)

हेही वाचा :  Gautam Adani यांनी जेफ बेझोसला टाकलं मागे, टॉप श्रीमंताच्या यादीत 'या' स्थानावर

शिरशासन

शिरशासन

बाबा रामदेव यांच्यानुसार Sirsasanaआसन आपल्या सर्वांना माहीत आहे. वज्रासनाच्या आसनात बसावे. आणि चटईवर हात सरळ रेषेत ठेवा. आता तुमचे डोके तुमच्या दोन्ही हातांच्या मध्ये घ्या आणि हळू हळू पाय वर करा. या स्थितीत तुमची पाठ सरळ असावी. या स्थितीत किमान 20 ते 30 सेकंद स्वत:वर नियंत्रण ठेवा.
(वाचा :- अभिनेता राजपाल यादवने केले हेअर ट्रान्सप्लांट, अशी झाली अवस्था जाणून घ्या किंमत आणि सर्व काही)

सर्वांगासन

सर्वांगासन

Sarvangasana करण्यासाठी पाठीवर सरळ झोपा आणि दोन्ही हात मांड्यांवर घट्ट ठेवा. आता हळुहळू तुमचे पाय वर उचलायला सुरुवात करा आणि सरळ ९० अंशाच्या कोनात घ्या. कोपर जमिनीवर ठेऊन, कमरेला हाताने आधार द्या आणि हळूहळू पाय डोक्याच्या दिशेने आणा. जेव्हा तुम्ही तुमचे पाय तुमच्या डोक्याकडे आणता तेव्हा तुमच्या पायाची बोटे जमिनीच्या दिशेने करा. कंबरेवरून हात काढा आणि जमिनीवर सरळ ठेवा. काही वेळ या आसनात राहा आणि नंतर हळूहळू मुख्य झोपेच्या स्थितीत या.

कपालभाती

कपालभाती

भारतीय संस्कृतीमध्ये योग या प्रकाराला खूप महत्त्व देण्यात आला आहे. जर तुमचे केस गळत असतील तर तुम्ही Kapalabhati हा योगा प्रकार करू शकता. हे आसन करण्यापूर्वी सर्वप्रथम वज्रासन किंवा पद्मासनाच्या आसनात जमिनीवर बसावे.हाताची पहिली बोट आणि अंगठा जोडून शांत मुद्रा करा. हाताचा खालचा भाग वरच्या बाजूला ठेवून गुडघ्यांवर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि ते एका झटक्यात बाहेर पडू द्या. यानंतर, त्याच प्रकारे श्वास घ्या आणि बाहेर श्वास सोडा. यामुळे केस वाढण्यास वाढण्यास मदत होईल.

हेही वाचा :  कोविड प्रेशर आणि सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे कमी वयातच मासिकपाळी, तज्ज्ञांचा खुलासा

अनुलोम विलोम

अनुलोम विलोम

बाबा रामदेवबाबा रामदेव यांच्या मते, Anuloma pranayama हे एक उत्तम आसन आहे. या असनाचा शरीराला खूप फायदा होतो आणि केसांनाही काही प्रमाणात फायदा होतो. हे आसन करण्यासाठी जमिनीवर मांड्या ठेवून बसा. डाव्या हाताच्या अंगठ्याने नाकाची उजवी नाकपुडी दाबा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा. नाकाच्या डाव्या नाकपुडीला दाबून असेच करा. ही प्रक्रिया सुरुवातीला हळू हळू करा आणि एकदा सवय झाली की ती दीर्घकाळ करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …