Gautam Adani यांनी जेफ बेझोसला टाकलं मागे, टॉप श्रीमंताच्या यादीत ‘या’ स्थानावर

मुंबई : जगभरातील टॉप श्रीमंतांची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीत भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी अ‍ॅमेझॉनचे (Amazon) माजी सीईओ जेफ बेझोस (Jeff Bezos) यांना मागे टाकले आहे. त्यामुळे आता जगभरातील टॉप श्रीमंतांच्या आकडेवारीत गौतम अदानी तिसऱ्या स्थानी पोहोचले आहेत, तर जेफ बेझोस चौथ्या स्थानी ढकलले गेले आहेत. विशेष बाब म्हणजे या आकडेवारीतील टॉप 10 मधील 9 उद्योगपतींना मोठं नुकसान सोसाव लागलं आहे, मात्र तरीही ते उद्योगपती आपलं स्थान टिकवून आहेत. 

श्रीमंतांची यादी 

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index), गौतम अदानी (Gautam Adani) 129 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. अॅमेझॉनचे माजी सीईओ जेफ बेझोस (Jeff Bezos) यांना अदानीने चौथ्या क्रमांकावर ढकलले आहे. जेफची आता 115 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. बिल गेट्स पाचव्या क्रमांकावर आहेत. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) 87 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आठव्या स्थानावर पोहोचले आहेत.

एक नंबर कोण? 

ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार  (Bloomberg Billionaires Index), श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) आहेत. 195 अब्ज डॉलर्ससह एलॉन मस्क पहिल्या स्थानी आहेत. त्यांच्यानंतर बर्नार्ड अर्नॉल्ट (Bernard Arnault) 136 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहे. गौतम अदानी (Gautam Adani) 129 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.    

हेही वाचा :  '...काँग्रेसला संपवण्याची सुपारी घेतली आहे,' झिशान सिद्दीकीचं मोठं विधान, 'मी मुस्लीम असल्याने...'

शेअर्समध्ये घसरण 

बुधवारी Amazon 4.82 टक्क्यांनी घसरून $92.12 वर आला. Apple Inc 3.73 टक्क्यांनी घसरला. टेस्ला $212.98 वर 5.64 टक्क्यांनी घसरला.अल्फाबेट इंक जवळपास 4 टक्क्यांनी घसरला. फेसबुक म्हणजेच मेटानेही जवळपास 5 टक्के ब्रेक लावला. मायक्रोसॉफ्टही 3.54 टक्क्यांनी घसरला. याचा परिणाम असा झाला की टॉप 10 अब्जाधीशांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे 30 अब्ज डॉलरची घट झाली.
गौतम अदानी (Gautam Adani) यांना वगळता, जगातील टॉप-10 श्रीमंत अब्जाधीशांपैकी 9 जणांनी आतापर्यंत $300 अब्जाहून अधिक संपत्ती गमावली आहे.

‘या’ उद्योगपतींच मोठं नुकसान

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index), जेफ बेझोस (Jeff Bezos) निव्वळ संपत्तीच्या घसरणीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत, त्यांच्या संपत्तीमध्ये या वर्षात आतापर्यंत 77.2 अब्ज डॉलरची घट झाली आहे. त्याचवेळी, एलॉन मस्कने (Elon Musk) एकूण 75.4 अब्ज डॉलर गमावले आहेत. तर, अदानी ही एकमेव व्यक्ती आहे ज्याने $52.2 अब्ज कमावले आहेत. अमेरिकन शेअर बाजारातील घसरण आणि अॅमेझॉन, टेस्ला, मेटा, अल्फाबेटसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सच्या घसरणीचा परिणाम जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या संपत्तीवरही झाला आहे.

दरम्यान ब्लूमबर्ग बिलियनेअर्सची (Bloomberg Billionaires Index) ही आजची आकडेवारी आहे. या आकडेवारीत दररोज बदल होत असतात. 

हेही वाचा :  बॉलिवूडवर ब्लॅक फिवर जान्हवी, काजोल, दुलकर सलमानचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून तुमचाही दिवस बनून जाईल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …