नोकरीच्या संधी.. कल्याण येथे 12 हजार 842 जागांसाठी महारोजगार मेळावा

Join WhatsApp Group

जॉबच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक संधी आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांच्या मार्फत दि.17 डिसेंबर 2022 पंडित दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा सकाळी 10.00 ते 5.00 या वेळेत गुणगोपाळ मंदिर मैदान, तिसगाव, चक्की नाका चौक, कल्याण पूर्व, ठाणे-421306 येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याद्वारे 12842 जागा भरण्यात येतील.

यामध्ये ठाणे येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच या मेळाव्यामध्ये उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महारोजगार मेळाव्यात खालील प्रमाणे कार्यक्रमाचा समावेश आहे

नोकरीच्या संधी :- या महारोजगार मेळाव्यामध्ये Quess Corp Ltd., ASCII Pvt Lts., Stealth Health Mngt, Reliable Labs Pvt Ltd, Gharda Chemicals, Hawkins Cookers Pvt Ltd, PSN Supply Chain Solutions PVt Ltd, Aadish Consultancy, Indo Amines, Reliable HUB”s Engineering (India) Pvt Ltd, Pitambari Products Pvt Ltd, Bharat Gears, Suyash Global Pvt Ltd, अशा प्रकारे विविध क्षेत्रात एकून – 12842 पदे उपलबध आहेत.

हेही वाचा :  NHM MP Recruitment 2023 – Opening for 92 Assistant Posts | Apply Online

स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय करणारे महामंडळांचा सहभाग :- या मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय उपलबध करून देणारे विविध शासकिय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाउ साठे विकास महामंडळ इ. ची माहिती पुरविणारी स्टॉल लावण्यात येणार असून याव्दारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकिय व खाजगी क्षेत्रातील बँकांचा हि समावेश असणार आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी :- राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत राज्यात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून त्यांच्यामार्फत राबविण्यात येणा-या विविध प्रशिक्षण योजनांच्या माहिती देण्यासाठी सहभागी होणार आहे.

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …