पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेत सहभागी होण्याचे कामगारांना आवाहन | Appeal workers participate Prime Ministers Labor Remuneration Scheme ysh 95


पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेत सहभागी होण्यासाठी कामगारांनी सेवा केंद्रात नाव नोंदणी करावी.

नागपूर : पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेत सहभागी होण्यासाठी कामगारांनी सेवा केंद्रात नाव नोंदणी करावी. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व विविध विभागांशी संलग्न काम करणाऱ्या कामगारांना या योजनेत सहभागी करण्यासाठी संबंधित विभागांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिल्या.

या योजनेसाठी १८ ते ४० वर्षे वयोगटातील कामगार पात्र असून सीएससी सेवा केंद्रात त्यांनी नोंदणी करावी. योजनेची माहिती ग्रामपंचायतपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक मोहीम राबवून जिल्ह्य़ातील अंगणवाडी सेविका, महिला बचत गट सदस्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाच्या विविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदारांकडील कामगारांना प्राधान्याने या योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

विविध क्षेत्रातील असंघटित कामगारांना वयाच्या ६० वर्षांनंतर निवृत्तीवेतन देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत असून वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर नोंदणीकृत लाभार्थी मासिक ३ हजार रुपये निवृत्ती वेतनास पात्र ठरतात. या योजनेत असंघटित क्षेत्रातील कामगार अनुक्रमे घरकाम करणारे कामगार, विटभट्टी कामगार, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, फेरीवाले, रिक्षाचालक, शेतमजूर, मनरेगा मजूर, मासेमारी करणारे, इमारत व इतर बांधकाम कामगार, मध्यान्ह भोजन वर्कर्स, नाका कामगार आदी व्यवसायात काम करणाऱ्यांचा यात समावेश आहे.

हेही वाचा :  नवरदेव बुलेट आणि १ लाखांच्या हुंड्यावर अडून, भर मंडपात सासऱ्याने 'अशी' घडवली अद्दल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …