पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात मोठी त्रुटी, इसम अचानक समोर आला आणि…पाहा व्हिडीओ

PM Modis security major lapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा ताफ्यात मोठी चूक समोर आली आहे. पंतप्रधान मोदी शनिवारी संध्याकाळी सिग्रा येथील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथून विमानतळाकडे निघाले असताना एका तरुणाने त्यांच्या ताफ्यासमोर उडी मारली. पंतप्रधानांच्या गाडीला नेहमीप्रमाणे सुरक्षा रक्षकांचा गराडा होता. धक्कादायक म्हणजे असे असतानादेखील हा तरुण पीएम मोदींच्या गाडीपासून अवघ्या 10 फूट अंतरावर पोहोचला होता. पंतप्रधान मोदींच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. 

पंतप्रधानांच्या सुरक्षा करणाऱ्या एसपीजी कमांडो आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या कर्मचार्‍यांनी या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले आहे. असे असले तरी पंतप्रधानांच्या  सुरक्षेतील मोठी त्रुटी निदर्शनास आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. दरम्यान पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर आलेला तरुण सध्या सिगरा पोलिस स्टेशनमध्येआहे. त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून एसपीजी टीम त्याची सखोल चौकशी करत आहे.

भाजपचा कार्यकर्ता असल्याचा दावा

शनिवारी संध्याकाळी उशिरा घडलेल्या या घटनेनंकर तरुणावा ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान आपण गाझीपूर जिल्ह्यातील रहिवासी असून भाजपचा कार्यकर्ता असल्याचे त्याने सांगितले. मला सैन्यात भरती व्हायचे आहे, असे या तरुणाचे म्हणणे आहे. लष्करात नोकरी मिळावी यासाठी आपण ताफ्यासमोर आल्याचे त्याने सांगितले. तरुणाला अटक करताना पोलिसांनी त्याच्याकडून एक फाईलही जप्त केली. ज्यामध्ये त्याची कागदपत्रे सापडली आहेत. 

तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, तो सैन्य भरतीची तयारी करत आहे. मात्र शारीरिक चाचणी उत्तीर्ण होऊनही तो वैद्यकीय चाचणीत नापास झाला. तरीही मला देशाची सेवा करायची आहे, म्हणून पंतप्रधानांकडून सूट मागायची होती. 

हेही वाचा :  युक्रेनबाबात 'या' 10 गोष्टी तुम्हाला माहितीयत का? जाणून तुम्हालाही बसेल धक्का

या तरुणाकडून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कार्यक्रमाचे ओळखपत्रही जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचा दावा खरा ठरत आहे. सध्या पोलिसांकडून त्याची अधिक चौकशी सुरू आहे.

हा तरुण गाझीपूरहून बनारसला पंतप्रधान मोदींना आवाहन करण्यासाठी आला होता. सुमारे तासभर तो पंतप्रधानांचा ताफा येण्याची वाट पाहत होता. अनेक ठिकाणी दाद मागूनही त्यांची सुनावणी झाली नाही. यामुळे त्याला थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचून सैन्यात भरती होण्यासाठी सूट मिळवायची होती.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …