युक्रेनबाबात ‘या’ 10 गोष्टी तुम्हाला माहितीयत का? जाणून तुम्हालाही बसेल धक्का

मुंबई : सोव्हिएत युनियनपासून 1990 मध्ये वेगळे झाल्यानंतर युक्रेन हा आता एक वेगळा देश झाला आहे. येथील लोक आनंदी जीवन जगतात. येथील लोक मोठ्या प्रमाणात शेती करतात. शेतीतून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. शेतीच्या बाबतीत, ते जगातील तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्या वाटेल परंतु येथील सुशिक्षित लोक शेती करतात. ते आधुवनिक शेतीच्या माध्यमातून भरघोस पिक देखील मिळवतात.

या देशाच्या पूर्वेला रशिया, उत्तरेला बेलारूस, पोलंड, स्लोव्हाकिया, पश्चिमेस हंगेरी, नैऋत्येस रोमानिया आणि मोल्दोव्हा, तसेच दक्षिणेस काळा समुद्र आणि अझोव्ह समुद्र आहे.

सोव्हिएत युनियनच्या फाळणीनंतर, युक्रेनला 780,000 च्या लष्करी शक्तीसह जगातील तिसरा सर्वात मोठा अण्वस्त्र शस्त्रागाराचा वारसा मिळाला. तसे, हा रशियानंतर युरोपमधील सर्वात मोठा लष्करी शक्ती असलेला देश आहे. येथे जवळ-जवळ सगळ्या लोकांना सैन्यात भरती अनिवार्य आहे.

सोव्हिएत युनियनमध्ये विलीन झाल्यानंतर युक्रेनची झपाट्याने वाढ झाली, परंतु वेगळे झाल्यानंतरही त्याचा विकास अधिक चांगला झाला आहे. येथील शहरे सुंदर आणि स्वच्छ राहतात. कीव ही येथील राजधानी आहे. तसेच युक्रेन विमान बनवण्यासाठीही प्रसिद्ध आहे. त्याने जगातील सर्वात मोठे विमानही बनवले आहे.

हेही वाचा :  दुकानदार म्हणाला 'तुला परवडणार नाही', तरुणाने खरेदी केलं अख्खं दुकान अन् त्यानंतर...; VIDEO व्हायरल

येथील बहुसंख्य लोकसंख्या ख्रिश्चन आहे, जे युक्रेनियन भाषा बोलतात. त्यानंतर येथील दुसऱ्या क्रमांकावर मुस्लिम लोक येतात.

युक्रेनमध्ये अशी 07 ठिकाणे आहेत जी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहेत. ज्यामध्ये कीवचे सेंट सोफिया कॅथेड्रल आणि ल्विव्हचे ऐतिहासिक केंद्र देखील मोडते. चेरनिव्त्सी विद्यापीठात एक खास प्रकारचे लाकडी चर्च आहे, तर येथील समुद्राला लागून असलेले जंगलही खास आहे. एकूणच हा देश निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जातो.

युक्रेनची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील फार सुनियोजित आहे. इथली प्रत्येक गावं, लहान गावं ही रेल्वे नेटवर्कने जोडलेली आहेत. ज्यामुळे दळण-वळण देखील सोपे झाले आहे. अनेक शहरांमध्ये स्वस्त बस आणि ट्राम सुविधाही आहेत. येथे अनेक विमानतळ आहेत आणि त्याची तिकीट देखील फार स्वस्त: आहे.

राजधानी कीवमध्ये मेट्रो ट्रेन लाइनचे जाळे आहे. कीवची स्वितोशिन्को ब्रोवर्स्का ट्रेन लाइन ही जगातील सर्वात खोल भुयारी मार्ग आहे, जी जमिनीच्या खाली 105.5 मीटर आहे. त्यातील बहुतांश मेट्रो स्थानकेही जमिनीच्या खाली आहेत. येथे वर आणि खाली जाणारे एस्केलेटर खूप लांब आणि भीतीदायक देखील आहेत.

युक्रेनच्या पारंपारिक अन्ना विषयी बोलायचे झाले, तर ते अतिशय चवदार आणि स्वादिष्ट आहे. त्यात चिकन, डुकराचे मांस, गोमांस, अंडी, मासे आणि मशरूम या पदार्थांचा समावेश आहे. युक्रेनचे लोक भरपूर बटाटे, धान्ये आणि ताज्या भाज्या व फळे खातात. खाण्याव्यतिरिक्त त्यांना वाईन आणि बिअरची खूप आवड आहे. 

हेही वाचा :  Sharaddha Walkar Murder Case : आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले, प्रत्येक खूनी मनोरूग्ण असतो का?

युक्रेन ब्रेडच्या व्हरायटीसाठी देखील प्रसिद्ध आहे. ज्याची तो युरोपातील इतर देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. येथील लोकांना ब्रेड खायला आवडते. तसेच हे लोक चीजचा देखील मोठ्या प्रमाणात जेवणात वापर करतात. येथे दर 100 मीटरवर तुम्हाला एक कॅफे नक्कीच मिळेल.

युक्रेनचे हवामान संमिश्र आहे. परंतु युक्रेनहा देश इतका मोठा आहे की, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भागात वेगवेगळ्या प्रकारचे हवामान  विविध प्रकारचे हवामान आहे. येथे उत्तरेकडील सरासरी तापमान 5.5 अंश ते 7 अंश, तर दक्षिणेस 11 ते 13 अंशांपर्यंत असते. येथील उन्हाळा तसा फार गरम नसतो. उन्हाळ्याचील येथील तापमान 17 ते 25 अंशांच्या दरम्यान असते. पण इथला हिवाळा कडक आणि बर्फाळ असतो.

येथील मुलींची गणना जगातील सुंदर मुलींमध्ये होते. ते मैत्रीपूर्ण आहेत आणि प्रेम करण्यास देखील पात्र आहेत. येथे डेटिंग करणं अधिक सामान्य आहे, परंतु येथील मुलीही इथल्या लोकांप्रमाणेच भावनिक आणि मूडी असू शकतात. 

येथील मुलींचा पोशाख स्मार्ट आणि सुंदर आहे. साधारणपणे इथल्या मुलींना आपलं आयुष्य त्यांच्या मर्जीनुसार घालवण्याचं स्वातंत्र्य आहे.

20 व्या शतकातील सर्वात भीषण आण्विक आपत्ती युक्रेनमधील चेरनोबिल येथे घडली. जेव्हा येथील अणुऊर्जा केंद्रातून रेडिएशन येऊ लागले. त्याचा मोठा फटका लोकांना बसला. ज्यामुळे येथील संपूर्ण शहर रिकामी करण्यात आलं. या रेडिएशनचा प्रभाव अजूनही येथे आहे. आता हे शहर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असले तरी येथे लोकवस्ती नाही.

हेही वाचा :  Budget 2023 : अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळणार, लोकांची काय आहेत अपेक्षा?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

बाबा वेंगाची 7 हादरवणारी भाकितं, 2024 मध्ये ‘या’ घटनांचा होणार जगावर परिणाम

Baba Vanga Predictions: नवं वर्ष म्हणजे 2024 सुरु व्हायरला आता काही दिवसांचा अवधी राहिला आहे.  …

Weird Tradition : ‘या’ ठिकाणी नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायको करते अश्लील डान्स, विचित्र प्रथेमागील कारण जाणून बसेल धक्का

Weird Tradition : जगाच्या पाठीवर जेवढ्या जाती, धर्म तितक्या त्यांच्या प्रथा आणि परंपरा. शेकडो वर्षांपूर्वीची …