वृद्धीमान साहाला पत्रकाराकडून धमकी, ट्विटरच्या माध्यमातून दिली माहिती

Wriddhiman Saha: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघातून वगळल्यानंतर भारतीय यष्टिरक्षक रिद्धिमान साहाला धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. साहाला व्हॉट्सअॅपवर एका पत्रकाराकडून ही धमकी मिळाली आहे, ज्याचा स्क्रीनशॉट साहानं सोशल मीडियावर शेअर केलाय. पत्रकार त्याला मुलाखतीसाठी धमकावत असल्याचं साहाचे मत आहे. “भारतीय क्रिकेटमधील माझ्या योगदानानंतर एका ‘प्रतिष्ठित’ पत्रकाराकडून मला अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतंय. पत्रकारिता इथेच संपते, असंही साहानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

पत्रकारानं साहाला काय धमकी दिली?
वृद्धीमान साहानं पत्रकारासोबत झालेल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट काढून ट्विटवर शेअर केलाय. ज्यात पत्रकार त्याला म्हणतोय की,  “तू माझ्यासोबत एक मुलाखत करशील. ते चांगले होईल. निवडकर्त्यांनी केवळ एकाच यष्टीरक्षकाची संघात निवड केलीय. सर्वोत्तम कोण आहे? तू 11 पत्रकारांची निवड करण्याचा प्रयत्न केला, जो माझ्या मते योग्य नाही. सर्वात जास्त मदत करू शकेल अशा एकाची निवड कर. तू कॉल केला नाहीस मी तुझी यापुढे कधीही मुलाखत घेणार नाही आणि मी ते लक्षात ठेवीन,” असंही पत्रकारानं त्याला म्हटलं आहे. 

ट्वीट-

अनुभवी खेळाडूंना कसोटी मालिकेतून वगळलं
वेस्ट इंडीजसह अखेरचा टी-20 सामना खेळल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेशी भिडणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्याची टी-20 मालिका आणि 2 सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. बीसीसीआयनं गुरुवारी श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानंतर काल भारतीय संघाची घोषणा केलीय. दरम्यान, वृद्धीमान साहासह भारताच्या अनुभवी खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आलंय. 

हेही वाचा :  भारतीय संघाचा चाहता घुसला मैदानात, सुरक्षारक्षकांकडून मारहाण सुरु होताच शमीने केली मध्यस्थी

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Steve Smith IPL 2023 : स्मिथ करणार आयपीएलमध्ये पुनरागमन, स्वत:च व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

IPL 2023 News : आयपीएलचा आगामी हंगाम अर्थात 16 वा सीझन काही दिवसांतच सुरु होत …

BCCI च्या आवाहनानंतर ICC चा मोठा निर्णय; इंदूरच्या खेळपट्टीची रेटिंग बदलली

India vs Australia Indore Test Pitch: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील चार …