2.3 सेकंदात 100kmph चा स्पीड, फक्त याच भारतीयकडे आहे ही ‘वंडर’ कार

मुंबई : आपल्याकडे कार असवी असं प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं स्वप्न असतं. परंतु काही असे देखील प्रेमी असतात. ज्यांना स्पोर्ट गाड्यांचं वेड असतं. स्पोर्ट्स कार या खूपच महाग असतात. त्यामुळे आपल्यालाला अशा कार एखाद्या मोठ्या सेलिब्रिटी जसे की, क्रिकेटर, एक्टर किंवा फुटबॉलरकडे पाहायला मिळतात.

रोल्स रॉयस असो वा कॅडिलॅक किंवा लॅम्बोर्गिनी, अशा कारचं कलेक्शन तुम्हाला भारतात पाहायला मिळेल. परंतु तरी देखील अशा अनेक कार आहेत, ज्या आपल्याला भारतात पाहायला मिळत नाही. तसेच त्याची किंमत इतकी जास्त असते की, ती सगळ्यांनाच घेता येणं शक्य होत नाही.

सुरुवातीला असे बोलले जात होते की बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याच्याकडे बुगाटी वेरॉन होती. मात्र याबद्दल कोणतीही गोष्ट त्याने स्पष्ट केली नाही.

परंतु तुम्हाला माहितीय की, एक असा भारतीय आहे. ज्याच्याकडे सर्वात महागडी कार आहे. या भारतीय व्यक्तीचे नाव आहे मयूर श्री. ज्याकडे बुगाटी शिरॉन सुपरकार आहे, तिची किंमत 21 कोटी आहे.

मयूर श्री हा एकमेव भारतीय आहेत ज्यांच्याकडे बुगाटी शिरॉन आहे. 21 कोटींच्या या सुपरकार व्यतिरिक्त, मयूर श्रीकडे इतर अनेक आलिशान कारचे कलेक्शन आहे.

हेही वाचा :  काय आहे 75 HARD Challenge? ज्यामुळे फुटतोय दरदरून घाम, 95% लोकांनी मानली हार

भारतात आणि परदेशात राहणार्‍या तशा काही भारतीयांकडे ही कार आहे. परंतु त्यांच्याकडे 12 कोटी रुपयांची बुगाटी वेरॉन आहे, परंतु मयूर श्री यांच्याकडे या कारचे शिरॉन मॉडेल आहे. मयूरश्रीच्या वडिलांनी त्याला ही कार भेट म्हणून दिली आहे.

बुगाटी शिरॉन व्यतिरिक्त, त्याच्याकडे  लैंबॉर्गिनी, एस्टन मार्टिन, पॉर्श, मॅक्लेरेन, रोल्स-रॉयस यांसारख्या अनेक उत्कृष्ट कार त्याच्या कार कलेक्शनमध्ये आहेत. मयूर श्री हा रिअल इस्टेट व्यावसायिक आहे.

सर्वात वेगवान कारपैकी एक

बुगाटी शिरॉन ही जगातील सर्वात वेगवान कार आहे आणि तिचे फक्त 100 युनिट्स जगभरात बनवले गेले आहेत. त्याची किंमत देखील जगातील सुपरकार्समध्ये सर्वात जास्त असल्याचे सांगितले जाते, ज्याचे उत्पादन केले गेले आहे. Bugatti Chiron मध्ये शक्तिशाली 8.0-लिटर क्वाड-टर्बो W16 इंजिन आहे जे 1479 Bhp आणि 1600 Nm पीक टॉर्क बनवते.

बुगाटी शिरॉनचा टॉप स्पीड 420 किमी/ताशी आहे, तर 0-100 किमी/ताशी वेग येण्यासाठी त्याला आणखी 2.3 सेकंद लागतात. स्पीड आणि किमतीनुसार या कारला मजबूत सेफ्टी फीचर्सही देण्यात आले आहेत.Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

क्लस्टर योजना सत्यात उतरणार! आशियातील सर्वात मोठ्या योजनेचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार शुभारंभ

ठाणे : देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील (Asia) सर्वात मोठ्या, महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक समुह विकास …

Amol Kolhe: राष्ट्रवादी शिरुरमध्ये भाकरी फिरवणार? अजितदादांच्या गुगलीनंतर कोल्हे गॅसवर?

Shirur Lok Sabha constituency: राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि अजितदादांचे खास… विलास लांडेंच्या (Vilas Lande) वाढदिवसानिमित्त …