मैत्रिणीला हॉटेलवर बोलवून 2 मित्रांकरवी बलात्कार, ‘तो’ व्हिडिओ होणाऱ्या नवऱ्याला पाठवण्याची धमकी

मैत्रिणीला हॉटेलवर बोलवून 2 मित्रांकरवी बलात्कार, ‘तो’ व्हिडिओ होणाऱ्या नवऱ्याला पाठवण्याची धमकी


UP Crime: मैत्रिणीला उधारी देणे एका युवतीला खूप भारी पडले आहे. माणूसकीच्या नात्याने तिने पैसे तर दिले पण जेव्हा पैसे परत घेण्याची वेळ आली तेव्हा आपल्यावर बलात्कार होईल याची तिला जाणिवही नव्हती. उधारी देण्याच्या बहाण्याने मैत्रिणीने तिला हॉटेलवर बोलावले आणि त्यापुढे जे झालं ते खूपच धक्कादायक होतं. उत्तर प्रदेशच्या प्रेमनगर येथे ही घटना घडली. 

पिडीत तरुणीने बारादरी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आहे. हुसेन बाग येथील रहिवासी शिफत अन्सारी ही माझ्या ओळखीची असून तिने माझ्याकडून 1 महिन्यांपूर्वी 30 हजार रुपये घेतले होते. ती 1 सप्टेंबरला ही रक्कम परत करणार होती. पण तिने तसे केले नाही. त्यानंतर 2 सप्टेंबर रोजी शितफने मला दीदीपुरम येथील हॉटेलमध्ये बोलावल्याचे तिने तक्कारीत म्हटले.

शितफने बोलावलेल्या ठिकाणी दरम्यान पिडित तरुणी पोहोचली. तिथे आधीच शिफतच्या ओळखीची दोन मुलं होती. सायंकाळी 6 वाजले होते. शिफतने पीडितेला पैसे देण्याच्या बहाण्याने सॅटेलाइट बसस्थानकाजवळील हॉटेलमध्ये नेले. येथे तिने दोन खोल्या आधीच बुक केल्या होत्या. शिफतने पिडित तरुणीला नशेचे कोल्ड्रिंक प्यायला लावले. यामुळे ती बेशुद्ध झाली.

याचा फायदा घेत शिफतच्या सोबतच्या मुलांना तिच्यावर बलात्कार करायला सांगितला. हे सुरु असताना शितफने तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि फोटोही काढल्याची माहिती पिडितेने पोलिसांना दिली.

हेही वाचा :  ट्युशनला जाणाऱ्या मुलीचे अपहरण, मुख्यमंत्र्यांनी केला हस्तक्षेप आणि...

पिडितेने या सर्व प्रकाराला विरोध केला. पण शितफ आणि तिच्यासोबतच दोन्ही तरुण खूप आक्रमक झाले आणि तिला धमकी देऊ लागले. तुला प्राण्याचे मांस खायला घालून तुझा धर्म आम्ही भ्रष्ट केला आहे, असे ते सांगू लागले.

पीडितेने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिल्यानंतर वेगाने पावले उचलण्यात आली आहेत. पोलिसांनी शिफत अन्सारी आणि तिच्या दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध एफआयआर नोंदवली. एससी कायद्यांतर्गत त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. दरम्यान पोलीस तिन्ही आरोपींची चौकशी करत आहेत.

तरुणीने तिचा दुसऱ्या धर्मातील मैत्रिण आणि तिच्या दोन साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपींची चौकशी सुरू असून मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. हा अहवाल आल्यानंतर पिडित तरुणी न्यायालयात आपले म्हणमे मांडेल. त्यावरुन दरम्यान पुढील कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आशिष प्रताप सिंग यांनी दिली.



Source link