डिलाइल रोड पुलाचे आदित्य ठाकरेंकडून उद्घाटन, पण पुल सुरू होणार कधी? BMCने स्पष्टचं सांगितलं

DeLisle Bridge Update: लोअर परळ येथील डिलाईल रोडचे आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी यांनी उद्घाटन केल्याचा वाद चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असतानाच आता मुंबई महानगरपालिकाही अॅक्शन मोडवर आली आहे. 

लोअर परळ येथील डिलाईल रोडची एक लेन गणेशोत्सवाच्या आधी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. मात्र पूर्ण क्षमतेने पुल खुला करण्यात न आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुलाचे उर्वरित काम पूर्ण करुन लवकरच पूर्ण क्षमतेने पुल खुला करण्याचे महापालिकेचे काम सुरू आहे. मात्र, पुलाच्या दुसऱ्या लेनचे काम पूर्ण होत आल्यानंतर गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पुलाचे उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यानंतर पालिकेला जाग आली आहे. 

ठाकरे गटाच्या नेत्यांकडून लोअर परळ पुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर मात्र पालिकेने उर्वरित काम पूर्ण करण्याचा वेग वाढवला आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदेशीर रित्या आणि शासकीय कामात अडथळा आणून डीलाई रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले आणि या विरोधात आता मुंबई महापालिका ॲक्शन मोड मध्ये आलेली पाहायला मिळतीये.

हेही वाचा :  मुंबईतील मुख्य भागात वसलीये खोकला देवी, खोकला बरा होण्यासाठी देवीला दिले जाते पीठ-मीठ

पुल कधी सुरू होणार? 

या डिलाई रोडवर इतर कामे अपूर्ण असताना आणि साधारणपणे सात दिवसानंतर ह्या ब्रिजचं काम पूर्ण करून ही लेन सुरू करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केलेला असताना अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदेशीर असल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकारांचे म्हणणं आहे.

महापालिकेकडून पुलाची राहिलेली लहानसहान कामे करण्याचा वेग वाढवण्यात आला आहे. काही ठिकाणी रंगकाम, फायनल टचेस करण्याची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर येत्या सात दिवसांच्या आत हा पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. 

पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्टेशनजवळ ना. म. जोशी मार्ग (डिलाइल पूल) व गणपतराव मार्ग यांना हा पूल जोडतो. आयआयटी मुंबईनं २०१८ मध्ये डिलाईल रोडला जोडणारा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर या पुलावरील वाहतूक बंद करुन पुलाचं काम सुरू करण्यात आले होते. 

गुन्हा दाखल होण्याची शक्यता 

दरम्यान, डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. एन एम जोशी पोलीस स्टेशन येथे मुंबई महापालिकेचे रोड डिपार्टमेंट कडून तक्रार दाखल करून इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून यासंबंधी आदित्य ठाकरे आणि इतरांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :  मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत मोठी चूक, भाषण देत असताना पायाखाली आला साप



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …