बापरे ! ऐन थंडीच्या दिवसांत चिकन 650 रुपये किलो; गॅस सिलिंडरचे भाव दोन ग्रॅम सोन्याइतके

Economic Crisis: (Chicken Rates) चिकनचे दर 650 रुपये किलो, एका गॅस सिलिंडरची किंमत (Gas Cylinder) 10 हजारांच्याही पलीकडे. या अशा किमती ऐकल्यानंतर भूक कुठच्या कुठे पळाली ना? हे फुगवलेले आकडे नाहीत, तर हे दाहक वास्तव आहे. भारताचं शेजारी राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) सध्या आर्थिक संकट आलं असून, देश दिवाळखोरीच्या दरीत कोसळला आहे. श्रीलंकेसम (Sri lanka) परिस्थिती आता या देशापासून चार पावलांवरच आहे असं म्हणायला हरकत नाही. 

महागाईचा आगडोंब… 

सध्या (Pakistan Econimic crisis) पाकिस्तानमधील नागरिकांवर महागाईची टांगती तलवार आहे, ही तलवार अर्थात महागाई नागरिकांचा घात करणार याचीच भीती आता जगभरातून व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानमधील परिस्थिती इतकी विदारक आहे, की खुद्द देशातील संरक्षण मंत्र्यांनीही या बिकट परिस्थितीला नाकारलेलं नाही. 

जीवनावश्यक वस्तू, उदरनिर्वाहाची साधनं, वीज या सर्व गोष्टींचे दर इथं गगनाला भिडले आहेत. चिकन, मांस आणि तत्तम पदार्थांचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. सध्या 650 रुपये किलो इतक्या किमतीला असणारे चिकनचे दर येत्या दिवसांत 800 रुपयांवर पोहोचणार आहेत. अन्न शिजवलं जातं तो स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडर इथं 10 हजार रुपयांवर पोहोचला आहे. आता असे दर असतील तर, जनता जगणार तरी कशी ? 

हेही वाचा :  माझी कहाणी : सासूने हद्दच केली हनिमूनलाही आली एकत्र , काय करावं या बाईचं

समारंभांसाठी वीज वापरताय? सरकारचं तुमच्यावर लक्ष आहे… 

देशात (Wheat and sugar rates) गव्हापासून साखरेपर्यंत प्रत्येक लहानसहान गोष्टीचेही दर वाढत असताना (Elecric Supply) वीजपुरवठ्यावरही याचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. ज्यामुळं पाकिस्तानमधील सरकारकडून वीजेच्या वापरावर नियंत्रण आणण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. नागरिकांच्या घरांमध्ये होणाऱ्या सोहळे- समारंभांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वीजेवरही याचे थेट परिणाम दिसून येत आहेत ही सध्या इथली शोकांतिका. 

पाकिस्तानवर असणाऱ्या कर्जाचा आकडाही दिवसागणिक वाढतच चालला आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानचा सीपीआय 24.5 टक्क्यांवर आला आहे. वर्षभराआधी हा आकडा 12.28 टक्के इतका होता. या साऱ्यामध्ये देशातील गरीबीच्या प्रमाणातही वाढ होत असून, हे प्रमाण तब्बल 35 टक्क्यांहूनही अधिक फरकानं वाढल्याची माहिती समोर आली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gold Rate: दरवाढ सुरुच…9 वर्षापूर्वी 24,000 रुपयांना मिळणारं सोनं आता 72,000 रुपये, काय आहे आजचे दर?

Gold Price Today In Marathi: सोनं आणि चांदीच्या दरात दररोज बदल होत असतात. गेल्या काही …

फडणवीसांच्या ‘पवार सतत कोलांटी उड्या घेतात’ टीकेवर पवार म्हणाले, ‘त्यांना पराभवाची..’

Sharad Pawar Slams Modi Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी …