कोविड प्रेशर आणि सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे कमी वयातच मासिकपाळी, तज्ज्ञांचा खुलासा

कोविड-१९ च्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटने पुन्हा एकदा जगभरात धुमाकूळ घातला आहे. असं असताना पुन्हा एकदा आरटीपीसीआर, मास्क आणि सॅनिटायझरची बंधने आली आहे. सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम झाले आहेत. त्यातीलच एक दुष्परिणाम म्हणजे मुलींना कमी वयात येणारी मासिकपाळी.

पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांनी यासंदर्भात एक अभ्यास केला आहे. यात असं निदर्शनास आलं आहे की, कोरोना आणि लॉकडाऊन याचा कमी वयातील मुलींवर खूप मोठा परिणाम झाला आहे. कमी वयातच मुलींना मासिक पाळी येऊ लागली आहे. महामारीचा तरूणाईवर होणारा परिणाम पालकांनी लक्षात घ्यायला हवा. (फोटो सौजन्य – iStock)

​पुण्यातील रुग्णालयात संशोधन

पुण्यातील एका रुग्णालयातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोविड लॉकडाऊनच्या काळात तरुणाईच्या सुरुवातीच्या घटना विशेषत: मुलींमध्ये ३.६ पट वाढल्या आहेत. नेमके कारण अद्याप ओळखले जाऊ शकलेले नाही परंतु साथीच्या आजाराच्या काळात आठ-नऊ वर्षांच्या मुलांमध्ये इडिओपॅथिक सेंट्रल प्रीकोशियस प्युबर्टी (iCPP) होण्याची संभाव्य कारणे अनेक असू शकतात. ज्यात तणाव, मोबाइल फोनचा वाढता वापर आणि सॅनिटायझरचा वाढता वापर यांचा समावेश आहे. , जहांगीर रुग्णालयातील संशोधकांनी सांगितले.

हेही वाचा :  Maharashtra Weather : पुढील 48 तास पावसाचे; मुंबई- कोकणात मात्र... हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा

(वाचा – शहाजीबापू वयाच्या साठीतही करताहेत डाएट, वर्कआऊट; ९ किलोने वजन घटवलं))

​सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे

लॉकडाऊन दरम्यान सॅनिटायझर्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. ट्रायक्लोसनच्या वाढत्या संपर्कामुळे मुलांमध्ये लवकर यौवन उत्तेजित होऊ शकते. या संबंधाची पुष्टी करण्यासाठी अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे. ट्रायक्लोसन हे टूथपेस्ट, साबण, डिटर्जंट्स, सॅनिटायझर्स, खेळणी आणि सर्जिकल क्लीनिंग ट्रीटमेंट्स यांसारख्या उत्पादनांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल एजंट आहे. हे अंतःस्रावी-व्यत्यय आणणारे रसायन (EDC) म्हणून ओळखले जाते जे यौवनाची वेळ आणि त्यातील बदलासाठी हे कारणीभूत ठरते.

(वाचा – How to Reduce High Cholesterol: नसांमध्ये भरलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे या ५ जीवघेण्या आजारांचा धोका, करा अचूक उपाय)

​यामागे कारण काय

कोविड लॉकडाऊन कालावधीत कमी वयातील मुलींमध्ये मासिक पाळीचे प्रमाण 3.6 पटीने वाढली. तसेच लॉकडाऊनच्या काळात इतर ऍक्टिविटीवर मर्यादा, वाढलेला स्क्रीन टाईम, हाय कॅलरीजचे खाद्यपदार्थ आणि जास्त प्रमाणात खाण्याच्या सवयी ज्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो आणि त्यामुळे तारुण्य लवकर येऊ शकते,” असे त्यात म्हटले आहे.

परफ्यूम, डिओडोरंट्स, टूथपेस्ट आणि मेकअप किट यांसारख्या वैयक्तिक काळजी उत्पादनांमध्ये आढळणारी रसायने विशेषत: मुलींमध्ये लवकर यौवनाशी संबंधित आहेत. साथीच्या रोगामुळे सॅनिटायझर्सच्या वापरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

हेही वाचा :  Corona | कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती वाढली, आरोग्य मंत्रालयाची तातडीची बैठक

वाचा – अरूंधतीच्या गालावर खळी नाही ही तर जखम, मधुराणीकडून मोठा खुलासा, ‘या’ आजाराचे नाव काय?))

​लवकर वयात येण्याला स्क्रिन टाइमही कारणीभूत

कोरोनाच्या काळात अतिप्रमाण स्क्रिन पाहिली गेली, मग ते मोबाईल असो किंवा टिव्ही. या सगळ्याचा परिणाम ८ ते पुढील वर्षांवरील मुलांच्या आरोग्यावर झाला. अशातच या मुलांचे खाणे बदलले आणि खेळातील ऍक्टिविटी पूर्णपणे बंद झाल्या. तसेच व्हिटामिन डी ची कमतरता देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. या सगळ्याचा परिणाम मुलींच्या मासिक पाळीवर झाला आहे.

(वाचा – अनंत अंबानीचा राधिका मर्चंटसोबत झाला रोका, १८ महिन्यांत या डाएट प्लानच्या मदतीने १०८ किलो वजन केलं कमी)

​काय काळजी घ्यावी

आता पुन्हा एकदा ओमिक्रॉनचे रूग्ण वाढू लागले आहेत. मास्क आणि सॅनिटायझरचा वापरही वाढला आहे. अशावेळी पालकांनी वयात येणाऱ्या मुली किंवा लहान मुलींच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. मुलींना खेळात ऍक्टिव ठेवणे गरजेचे आहे.

(वाचा – Couvade Syndrome: जेव्हा पुरूष गरोदर होतात, त्यांच्यामध्ये दिसतात ही लक्षणे)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …