बाबा रामदेव यांनी दिला परफेक्ट Diet Plan, फॉलो कराल तर अनेक आजारांपासून राहाल दूर

Best Time To Eat Food: योग गुरू बाबा रामदेव नेहमीच आपल्या व्हिडिओतून Health Tips आणि Food Tips देत असतात. धावपळीच्या आयुष्यात योग्य फिटनेस आणि योग्य आहार हवा असेल तर यातून अनेकदा बरीच चांगली माहिती मिळते. आपण हल्ली कोणत्याही वेळी खातो आणि कोणतेही पदार्थ खातो. त्यामुळे अनेकदा आजारांना आमंत्रण देत असतो. पण कोणत्या वेळी आणि कशा पद्धतीचे जेवण दैनंदिन आयुष्यात असायला हवे हे बाबा रामदेव यांच्याकडून घ्या जाणून. (फोटो सौजन्य – Yogen Shah, Canva)

कसे आणि कोणत्या वेळी खावे (सौजन्य – YouTube)

​ऋतुनुसार करावे खाण्यात बदल​

​ऋतुनुसार करावे खाण्यात बदल​

आयुर्वेदात वेगवेगळ्या ऋतुनुसार खावे असं सांगण्यात आलं आहे आणि हेच बाबा रामदेवदेखील सांगतात. तसंच वात, पित्त प्रकृतीनुसार खाण्यात बदल करण्याची आवश्यकता असते. अन्यथा अनेक आजारांना सामोरे जावे लागते. याची सर्वांना माहिती असते असंच नाही.

हेही वाचा :  केस गळणं थांबण्यासाठी रामदेव बाबांनी सांगितले खास उपाय, केस भराभर वाढतील

​एकच नाश्ता कधीच करू नये​

​एकच नाश्ता कधीच करू नये​

सकाळच्या नाश्त्यामधील योग्य आहार काय असावा याबाबत बाबा रामदेव यांनी सांगितले की, सकाळचा नाश्ता हा कधीच एकच पदार्थाचा नसावा. नेहमी तोच तोच पदार्थ खाऊ नये. तर नाश्त्यामध्ये अंकुरित कडधान्याचा समावेश अवश्य करावा. यामधून लोह, प्रोटीन, कॅल्शियम उत्तम प्रमाणात मिळते. सर्वाधिक प्रोटीन मशरूम्स, डाळी, दूध, दही यामध्ये असते, त्यामुळे याचाही समावेश करून घ्यावा.

(वाचा – ४१ व्या वर्षीही विशीतला फिटनेस वयालाही देतेय मात अमृता राव, काय आहे डाएट)

​जेवणामध्ये सर्व धान्याचा करा समावेश​

​जेवणामध्ये सर्व धान्याचा करा समावेश​

रोज वेगवेगळ्या भाजी, पालेभाजी आणि वेगवेगळ्या धान्याच्या चपाती अथवा भाकरीचा समावेश हा दुपारच्या जेवणात अथवा रात्रीच्या जेवणामध्ये असावा. यामध्ये जवस, बाजरी, नाचणीची भाकरी असावी. केवळ गव्हाच्या चपाती रोज घाऊ नये. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा फायदा मिळतो. याशिवाय नेहमी जेवणात वेगवेगळ्या सलाडचा समावेश करा.

​दिवसभरात २ चमचे तूप खावे​

​दिवसभरात २ चमचे तूप खावे​

आहारामध्ये तुम्ही किमान २ चमचे तुपाचा समावेश करून घ्यावा. दोन चमच्यापेक्षा अधिक तूप खाल्ल्यावर अधिक चरबी शरीरामध्ये जमा होऊ शकते. रोज २० ग्रॅमपेक्षा अधिक फॅट शरीरामध्ये जाता कामा नये. मात्र तूप नियमित खाल्ल्याने त्वचा, केस आणि शरीराला फायदे मिळतात.

हेही वाचा :  Maharashtra political crisis : सत्तासंघर्षाच्या निकालासाठी आणखी 'इतके' महिने वाट पाहावी लागणार ?

​दूध, दही आणि ताक हे नियमित खावे​

​दूध, दही आणि ताक हे नियमित खावे​

गॅस कमी करण्यासाठी, पोटातील जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही नियमित दूध,दही आणि ताकाचा आहारामध्ये समावेश करून घ्यावा. मात्र दुधासह विटामिन सी युक्त फळ खाऊ नयेत. दुधामध्ये सगळी फळं मिक्स करून फ्रूट सलाड बनविण्यात येते. मात्र हे आपल्या शरीरासाठी नुकसानदायी ठरते. रात्रीचे जेवण हलके असावे आणि जेवल्यानंतर एक तासाने दूध प्यावे.

(वाचा – Maghi Ekadashi Upvas: उपवास करणे आरोग्यासाठी फायदेशीर?)

​पाणी कधी प्यावे?​

​पाणी कधी प्यावे?​

आयुर्वेदात सांगण्यात आल्याप्रमाणे जेवणाच्या आधी पाणी प्यावे. जेवल्यानंतर किमान १ तास तरी पाणी पिऊ नये कारण हे शरीरासाठी विष ठरते.

(वाचा – डायबिटीसमध्ये या पिठामुळे शोषली जाते रक्तातील साखर, Blood Sugar Level कमी होण्यासाठी करा वापर)

​खाण्याचा क्रम कसा असावा?​

​खाण्याचा क्रम कसा असावा?​

सर्वात पहिल्यांदा सलाड खावे, त्यानंतर फळं खावीत. त्यानंतर जेवणात चपाती, भाजी, आमटी भात असा क्रम असावा आणि सर्वात शेवटी ताटातील गोड पदार्थ खावा. हा क्रम चुकवू नये. सर्व आजारांपासून दूर राहायचे असेल तर आहारातील हा क्रम अत्युत्तम आहे आणि तुमचा डाएट प्लॅन योग्य राखून तुमचे आरोग्य चांगले राखण्यासही मदत मिळते.

हेही वाचा :  सर्व बाजूनी ओपन असणाऱ्या पिंक ड्रेसमध्ये ४९ वर्षात मलायका अरोराचा कातीलाना अंदाज

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …