पिंपल्सला करा कायमच बाय बाय, नितळ त्वचेसाठी बाबा रामदेव सांगितलेली ही योगासने ठरू शकतात फायदेशीर

आहारात झालेला बदल ,अनियंत्रित जीवनशैली या सर्व गोष्टींचा परिणामांमुळे त्वचेवर फोड आणि पिंपल्स येतात. हिवाळ्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. त्वचा तज्ज्ञांच्या मते, त्वचेवर फोड येणे हे बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होते. अशा परिस्थितीत स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. योगगुरू बाबा रामदेव देखील फोडांवर उपचार करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. यामध्ये त्यांना काही सोपे योगा प्रकार सांगितले आहेत. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खूप उत्तम ग्लो येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे उपाय. (फोटो सौजन्य : Istock, @swaamiramdev)

​कपालभाती

कपालभाती योगा प्रकार केल्याने चेहऱ्यावरील फोड पुरळ बरे होण्यास मदत होते. कपालभातीद्वारे कार्बन डायऑक्साइड शरीरातून दररोज बाहेर पडतो. असे केल्याने रक्त देखील शुद्ध होते, ज्यामुळे त्वचेशी संबंधित आजार दूर होण्यास मदत होते. आम्ही तुम्हाला सांगतो की कपालभाती केल्याने पचनक्रिया देखील सुधारते आणि रक्त परिसंचरण देखील वाढते, ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते. (वाचा : – Juice for Glowing Skin : वेटलॉस सोबतच डाग विरहित, चमकदार त्वचा हवी असेल तर हे ४ ज्युस ठरतील वरदान)

हेही वाचा :  कांद्यांच्या सालींचा ‘या’ पद्धतीने वापर करून मिळवा लांबसडक, घनदाट व काळेभोर केस, कच-यात टाकण्याची करू नका चूक..!

​उत्तानासन

अनेक वेळा तणावामुळे मुरुमांची समस्याही उद्भवते. स्वामी रामदेव यांच्या मते, उत्तानासन केल्याने शरीर ताणले जाते आणि किडनी आणि यकृत निरोगी राहण्यास मदत होते. हे योगासन रोज केल्याने फोड आणि पिंपल्सची समस्याही दूर होऊ शकते, तसेच या योगासनमुळे हार्मोन्स संतुलित राहतात, ज्यामुळे त्वचेशी संबंधित आजार दूर होण्यास मदत होते. हा योगा प्रकार तुम्ही लगेच करु शकत नाही. (वाचा :- मुलीच्या प्लास्टिक सर्जरीच्या दाव्यावर काजोल स्पष्टच बोलली म्हणाली… )

​शिर्षासन

योगगुरू स्वामी रामदेव यांच्यानुसार, शीर्षासन केल्याने शरीरात रक्तप्रवाह बरोबर राहतो. याशिवाय दररोज सुमारे 10 मिनिटे हे योगासन केल्याने त्वचेतील फोड आणि पिंपल्सच्या समस्येसोबतच सुरकुत्याची समस्याही दूर होते. हे योग आसन चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासही मदत करते. (वाचा :- तुमच्या ‘या’ एका चुकीमुळे वाढू शकतात तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, आजच सोडून द्या ही वाईट सवय)

​हे घरगुती उपाय देखील प्रभावी आहेत:

  • नारळाच्या तेलात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म देखील असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात नारळाच्या तेलाने मसाज करा.
  • कडुलिंबाच्या पानांमध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असतात, त्याची पाने कुस्करूनही लावता येतात.त्याच प्रमाणे अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्ही कडुलिंबाची पाने टाकू शकता.
  • हळद आणि दूध एकत्र करून पेस्ट बनवा. यामुळे फोड आणि मुरुम लवकर कोरडे होतात.
  • तुळशीच्या पानांची पेस्ट देखील तुमच्या मुरुमांसाठी गुणकारी आहे. (वाचा :- Hair Growth केस प्रचंड गळतात? चिंता सोडा स्वयंपाकघरातील पदार्थांपासून मिळतील घनदाट केस )
हेही वाचा :  चेहरा धुतल्यानंतर टॉवेलनं पुसता? असं का करायला नको जाणून घ्या...

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …