महागडे शॅम्पू
बाबा रामदेवांच्या मते महागडे शॅम्पू आणि कंडिशनर्स विकत घेऊ नका. यामधील केमिकलमुळे तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. पण जर तुम्हाला शॅम्पू वापरायचा असेल तर त्याआधी तुम्ही केसांना मोहरीचे तेल, खोबरेल तेल किंवा दही लावा त्यामुळे केस आजपर्यंत मजबूत राहतात.
बोटांची नखं एकमेकांना घासा
सगळ्यात आधी ५ मिनिट बोटांची नखं एकमेकांना घासा. जर तुम्ही उच्च रक्तदाबाचा त्रास नसेल तर २ ते ५ मिनिटं शीर्षासन किंवा सर्वांगासन करू शकता. हे केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. पण गरोदर महिलांनी आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तीने हा उपाय करु नये. (वाचा :- आता ५ रुपयांत मिळणार मऊ मुलायम केस, पेट्रोलियम जेलीचा असा करा वापर, Jawed Habib ने सांगितला सोपा उपाय)
आवळा चुर्ण
केसांच्या वाढीसाठी आवळा चुर्ण सेवन करु शकता. किंवा आवळ्याचा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वापर करु शकात. यामुळे केसांच्या वाढीसाठी हे खूप फायदेशीर ठरते.
हा रस ठरेल वरदान
केसांसाठी त्याच प्रमाणे वजन कमी करण्यासाठी दुधीचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच दुधीचा रस आणि आवळ्याचा रस नियमित प्यायल्याने आठवडाभरात केसगळती थांबते.
केसांना तेल लावा
रामदेव बाबांनी केस धुण्याच्या एक दिवस रात्री केसांना तेल लावण्याचाही सल्ला दिला आहे. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होईल. (वाचा :- Skin Infection : हिवाळ्यात ‘या’ चुकीच्या सवयींमुळे त्वचा सोलली जाते, असू शकतात गंभीर आजार)
दह्याचा वापर
रामदेव बाबांनी सांगितले की केस धुण्यासाठी दही किंवा आंबट ताक वापरता येते. की त्यांचा वापर केल्याने कोंडा किंवा खाज येण्याची समस्या दूर होते. (वाचा :- या १० कारणांनी डोळ्यांखाली येतात डार्क सर्कल्स, हे सोपे घरगुती उपाय करतील समस्येचा नाश)
रेशमी केसांसाठी हा उपाय
ताकामध्ये मुलतानी माती, थोडे खोबरेल तेल आणि लिंबाचा रस मिसळा. त्यामुळे डोके स्वच्छ होण्यासोबतच केस रेशमी बनतील. (वाचा :- मुरुमांसाठी गर्भनिरोधक गोळ्या खाणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या डॉक्टरांचे मत)
योग्य आहार
पौष्टिक आहार, हिरव्या भाज्या, फळे खाण्यास सांगितले. त्याच वेळी, त्यांनी अधिक तळलेले आणि मसालेदार पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. बाबांनी असेही सांगितले की ज्यांना जास्त राग येतो किंवा चिंतेत राहतात त्यांचेही केसही जास्त पिकतात. त्यामुळे तुम्ही योगा देखील करु शकता. (वाचा :- Akshaya Hardeek Wedding : नादखुळा पाठकबाईंनी नखांवर कोरली लग्नाची तारीख अन् ‘ते’ खास नाव)
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या

