VIDEO: वनडे मालिकेसाठी बांगलादेशमध्ये पोहचला भारतीय संघ, विराट-रोहितचे फोटो आले समोर

India vs Bangladesh ODI Series: भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये चार डिसेंबरपासून एकदिवसीय सामन्याची मालिका सुरु होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात गुरुवारी भारतीय संघ बांगलादेशमध्ये दाखल झालाय. रोहित शर्मासह विराट कोहली आणि इतर खेळाडूंचं विमानतळावर स्वागत करण्यात आलं. बांगलादेशमध्ये पोहचल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांकडून या फोटोला पसंती मिळत आहे.

गुरुवारी भारतीय संघ बांगलादेशमध्ये दाखल झाला. मुंबई विमानतळावरुन भारतीय संघ रवाना झाला होता. विराट कोहली आणि रोहित शर्मासह टीम इंडियाचे खेळाडूंचं बांगलादेश विमानतळावर पारंपारिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. खेळाडूंना पुष्पगुच्छल देण्यात आले. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसह टीम इंडिया विमानतळावरुन हॉटेलमध्ये पोहचली आहे. भारतीय संघातील खेळाडू लवकरच सरावाला सुरुवात करतील. चार डिसेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच बांगलादेशच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. सुत्रांच्या महितीनुसार कर्मधार तमीम इकबाल दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

News Reels

हेही वाचा :  पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरचं ट्वीट अन् मोहम्मद शामीचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला...

बांग्लादेशविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ –  
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मो. शमी, मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन

भारताविरोधात मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेशचा संघ : 
तमीम इकबाल (कर्णधार), लिटन दास, अनामुल हक बिजॉय, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, यासिर अली चौधरी, मेहदी हसन मिराज, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद, हसन महमूद, इबादत हुसैन, नसुम अहमद, महमूद उल्लाह, नजमुल हुसैन शान्तो आणि काजी नूरुल हसन सोहन.

कोणत्या मैदानावर होणार सामने?
बांगलादेश आणि भारत यांच्यादरम्यान तीन एकदिवसीय सामन्याची मालिका होणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने ढाकामधील मीरपूरच्या शेर-ए-बांग्ला नॅशनल क्रिकेट स्टेडियम (एसबीएनसीएस) मध्ये होणार आहे.  तीसरा वनडे सामना चटगांवमधील जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर होणार आहे.  

हेही वाचा :  ICC Ranking : जसप्रीत बुमराहला श्रीलंकेविरुद्धच्या कामगिरीचं फळ मिळालं, विराटची मात्र घसरण

भारत आणि बांग्लादेश एकदिवसीय सामन्याचं वेळापत्रक: 







सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 4 डिसेंबर  शेर ए बांग्ला, ढाका
दुसरा एकदिवसीय सामना 7 डिसेंबर शेर ए बांग्ला, ढाका
तिसरा एकदिवसीय सामना 10 डिसेंबर  शेर ए बांग्ला, ढाका



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …