Rashtrapati Bhavan: सर्वसामान्यांसाठी खुले होणार राष्ट्रपती भवन; तुम्हालाही पाहता येईल, जाणून घ्या कसं?

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : प्रत्येक व्यक्तीला वाटतं की कधी तरी राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan) आपल्याला पाहता यावं. अशा अनेक लोकांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. कारण राष्ट्रपती भवन 1 डिसेंबरपासून आठवड्यातून पाच दिवस सर्वसामान्यांसाठी खुले (Rashtrapati Bhavan Open to general public) झाले आहे. राष्ट्रपती भवनाला आठवड्यातील 5 दिवस बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी भेट देता येणार आहे. राजपत्रित सुट्टीच्या दिवशी इमारत बंद राहणार आहे. या दरम्यान दिवसभरात येणा-या सर्वसामान्य नागरिकांसाठी पाच स्लॉट (Five slots for citizens)निश्चित करण्यात आले आहेत. ज्याचे बुकिंग (Rashtrapati Bhavan Booking) तुम्हाला आधीच करावी लागणार आहे. (Tour of Rashtrapati Bhavan to be opened for general public you can see read more marathi news)

वेळ काय असेल?

राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan)सर्वसामान्यांच्या प्रवेशासाठी 5 स्लॉट निश्चित करण्यात आले आहेत. मॉर्निंग स्लॉट्स (Morning slots) सकाळी 10 ते 11 आणि 11 ते 12 वाजेपर्यंत तुम्हाला पाहता येणार आहे. तसेच दुपारी 12 ते 1, 2 ते 3 आणि 3 ते 4 या वेळेत दुपारच्या स्लॉटलाही (Afternoon slot) भेट देऊ शकता. प्रत्येकी एक तासाचा पाच वेळ स्लॉट बुक करणे आवश्यक असणार आहे. शनिवारी राष्ट्रपती भवन भेटीची वेळ सकाळी 8 ते 9 अशी असेल. यादरम्यान राष्ट्रपती भवनाच्या सभागृहात चेंज ऑफ गार्ड सोहळा (Change of Guard Ceremony) पाहण्याचीही संधी मिळणार आहे.

हेही वाचा :  Ambani Family : मुलंच नाही, अंबानी कुटुंबाच्या सूनाही आहेत उच्चशिक्षित; एकीची पदवी वाचून हैराण व्हाल!

राष्ट्रपती भवनमध्ये काय पाहता येणार?

सामान्य लोकांसाठी, राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan) तीन भागांमध्ये विभागले गेले आहे, सर्किट एक, सर्किट दोन आणि सर्किट तीन. सर्किट वन मध्ये मुख्य इमारत, अंगण, रिसेप्शन हॉल, नवचारा (Main Building, Courtyard, Reception Hall, Navchara), बँक्वेट हॉल, वरचा लॉगजीया, लुटियन्स ग्रँड स्टेअरकेस, गेस्ट विंग, अशोका हॉल, नॉर्थ ड्रॉइंग रूम, लाँग ड्रॉइंग रूम, लायब्ररी, दरबार हॉल, भगवान बुद्ध पुतळा (Banquet Hall, Upper Loggia, Lutyens Grand Staircase, Guest Wing, Ashoka Hall, North Drawing Room, Long Drawing Room, Library, Durbar Hall, Lord Buddha Statue) यांचा समावेश आहे. सर्किट दोनमधील राष्ट्रपती भवन म्युझियम कॉम्प्लेक्स (Rashtrapati Bhavan Museum Complex) आणि सर्किट तीनमध्ये चेंज ऑफ गार्ड सोहळा (Change of Guard Ceremony) यांचा समावेश आहे.

बुक कसं करायचं? 

राष्ट्रपती भवन पाहण्यासाठी पहिल्यांदा rb.nic.in/rbvisit/visit_plan.aspx या वेबसाईटवर जा. त्यात खालील कॅलेंडरमध्ये तारीख निवडा आणि बुक करा. बुकिंगसाठी पर्याय निवडल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. त्यात विचारलेली माहिती भरा. त्यात तुमच्या भेट देणाऱ्या लोकांची संख्या, दिवस, भेटीची वेळ टाका. अशा प्रकारे तुम्ही राष्ट्रपती भवनाची टूर (Tour of Rashtrapati Bhavan) बुक करू शकता.

हेही वाचा :  आजपासून निम्मे राज्य निर्बंधमुक्त ; ७० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यांना दिलासाSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Anti Paper Leak Law: मोठी बातमी! पेपरफुटीला बसणार आळा; सरकारने मध्यरात्री नवा कायदा केला लागू

What is Anti Paper Leak Law: युसीजी नेटचा पेपर लीक झाल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात …

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …