केस गळणं थांबण्यासाठी रामदेव बाबांनी सांगितले खास उपाय, केस भराभर वाढतील

वातावरणातील बदलामुळे केस पांढरे, केस गळणं, सध्या खूपच सामन्य झालं आहे. यासाठी अनेक उपाय केले जातात. महागडे शॅम्पू, पार्लरच्या ट्रिटमेंट्स अशा गोष्टींचा समावेश केला जातो. प्रदुषण, केसांवर वारंवार केले जाणारे केमिकल्सचे प्रयोग आणि आहारातूनही पुरेसं पोषण न मिळणे या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येकालाच केसांबाबत कोणती ना कोणती तक्रार आहे. केसगळतीमुळे त्रासलेल्या अशा लोकांसाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेले काही उपाय रामबाण उपाय ठरू शकतात. हे उपाय तुम्ही घरच्या घरी करु शकता. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत ते उपाय. (फोटो सौजन्य : istock, @saipallavi.senthamarai)

​पहिला उपाय

केस गळणं थांबविण्यासाठी किंवा केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी रामदेव बाबांनी सांगितलेला हा पहिला उपाय अगदी सोपाही आहे. हा उपाय म्हणजे दोन्ही हातांची नखे एकमेकांवर घासणे. दिवसांतून कधीही १० मिनिटांसाठी हा उपाय करून बघा. सोशल मीडियावर टाईमपास करताना, पुस्तक वाचताना तुम्ही हा उपाय करु शकता.

​दुसरा उपाय

रामदेव बाबांनी सांगितलेला दुसरा उपाय म्हणजे आवळा ज्यूस करून पिणे. आवळ्यामध्ये असणारे पौष्टिक घटक केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात.सध्या आवळ्याचा हंगाम आहे. त्यामुळे आवळ्याचा फ्रेश ज्यूस घरी सहज करता येईल. आवळा कॅन्डी किंवा आवळ्यापासून बनलेले पदार्थ देखील तुम्ही खाऊ शकता. (वाचा :- Hair Fall Solution : ८ दिवसात केसांचं गळणं होईल कमी,घनदाट केसांसाठी Baba Ramdev नी सांगितले खास उपाय)

हेही वाचा :  Rapunzel syndrome: वसईच्या १३ वर्षांच्या मुलीच्या पोटात आढळला १.२ किलो केसांचा पुंजका, यामागे विचित्र आजार कारणीभूत

​केसांना तेल लावा

रामदेव बाबांनी केस धुण्याच्या एक दिवस रात्री केसांना तेल लावण्याचाही सल्ला दिला आहे. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होईल. केसांनी तेल लावल्याने केसांची उत्तम वाढ होते.

​​योग्य आहार

आहारात तुम्ही हिरव्या भाज्या, फळे खाण्यास सांगितले. त्याच वेळी, त्यांनी अधिक तळलेले आणि मसालेदार पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. बाबांनी असेही सांगितले की ज्यांना जास्त राग येतो किंवा चिंतेत राहतात त्यांचेही केसही जास्त पिकतात. त्यामुळे तुम्ही योगा देखील करु शकता. (वाचा :- अभिनेता राजपाल यादवने केले हेअर ट्रान्सप्लांट, अशी झाली अवस्था जाणून घ्या किंमत आणि सर्व काही)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …