“मी आत्मघाती हल्लेखोर होऊन सर्व विरोधकांना उडवून टाकेन”; नेत्याचं धक्कादायक वक्तव्य | I will become one and blow up entire opposition says Pakistan minister over Imran Khan led govt faces a vote of confidence sgy 87


“आत्महत्या हराम आहे, पण माझी इच्छा आहे की आत्मघाती हल्लेखोर होऊन सर्व विरोधकांना उडवून टाकायचं”

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागत असल्याने सत्ताधारी विरोधकांवर जोरदार टीका करत आहेत. यावेळी काही नेत्यांनी तर विरोधकांना संपवून टाकण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानचे नागरी उड्डाण मंत्री गुलाम खान यांनी तर आत्मघाती हल्लेखोर होऊन सर्व विरोधी पक्षांना उडवून टाकेन असं वक्तव्य केलं असून यावर मोठा वाद निर्माण झाला आहे.

गुलाम खान यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते म्हणत आहेत की, “आत्मघाती हल्ल्याला इस्लाममध्ये बंदी असली तरी मी हल्लेखोर इम्रान खान यांच्या नेतृत्वातील पाकिस्तान सरकारला पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना उडवून टाकेन”.

“आत्महत्या हराम आहे, पण माझी इच्छा आहे की आत्मघाती हल्लेखोर होऊन सर्व विरोधकांना उडवून टाकायचं,” असं गुलाम खान म्हणत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुढे बोलताना त्यांनी देशाचे आणि धर्माचे सर्व शत्रू ज्या ठिकाणी एकत्र जमले असतील तिथे जाऊन आपल्यासह सर्वांना बॉम्बने उडवून टाकण्याची इच्छा असल्याचंही यावेळी ते म्हणाले.

हेही वाचा :  Pakistan : इम्रान खान यांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला

इम्रान खान यांनीदेखील अविश्वास प्रस्तावावरुन विरोधकांवर निशाणा साधला असून आपल्याला सत्तेतून खाली खेचण्यासाठी पाश्चिमाच्या देश आणि खासकरुन अमेरिकेसोबत हातमिळवणी केली असल्याचा आरोप केला आहे. याआधी त्यांनी आपले १० लाख समर्थक अविश्वास प्रस्तावावरील मतदानाच्या दिवशी डी चौकात एकत्र येतील अशी धमकी विरोधकांना दिली होती.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Godrej Family Tree : लहानपणी तुमच्याही घरात असेल या कंपनीचे कपाट, आता 14 लाख कोटींची कंपनी

देशातील सर्वात जुन्या कुटुंबांपैकी एक असलेले गोदरेज कुटुंब आज तब्बल 127 वर्षांनंतर विभक्त होणार आहे. …

‘असा कसा डॉक्टर बनणार रे तू?’; छोट्या भावाला डॉक्टर बनवण्यासाठी मोठा भाऊ देत होता परीक्षा

Fraud in NEET 2024: देशभरातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी नॅशनल एलिजिबीलीटी एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात येते. …