दिल्लीत झोपडपट्टीला आग; ७ जणांचा मृत्यू | Fire in Delhi slums 7 killed akp 94


‘आम्ही झोपेत असताना रात्री साडेबाराच्या सुमारास आगीला सुरुवात झाली. ती कुठून व कशी सुरू झाली याची आम्हाला काहीच कल्पना नाही.

ईशान्य दिल्लीतील झोपडपट्टीमध्ये शनिवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत तीन मुलांसह ७ जण मरण पावले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगीतील जीवहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.

 १३ वर्षांचा रोशन व त्याची ९ वर्षांची बहीण दीपिका अशी एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुले आगीत जळाली. मृतांपैकी अतर ५ जण दुसऱ्या कुटुंबातील होते. त्यांची नावे बबलू (३२), रणजित (२५), रेश्मा (१८), प्रियंका (२०) व शहंशाह (१०) अशी आहेत.

‘आम्ही झोपेत असताना रात्री साडेबाराच्या सुमारास आगीला सुरुवात झाली. ती कुठून व कशी सुरू झाली याची आम्हाला काहीच कल्पना नाही. आमची एकच खोली आहे. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी आम्ही झोपडीबाहेर पडलो’, असे रोशन व दीपिका यांचे ५८ वर्षांचे आजोबा संतू यांनी सांगितले.

अग्निशामक दलाचे १३ बंब घटनास्थळी रवाना झाले आणि पहाटे ४ वाजताच्या सुमारास आग पूर्णपणे नियंत्रणात आली. सुमारे ६० झोपडय़ांना आगीची झळ पोहचली व त्यापैकी ३० झोपडय़ा आगीत पूर्णपणे जळाल्या. आगीने बेचिराख झालेले ७ मृतदेह आगीच्या ठिकाणी सापडले, असे दिल्ली अग्निशामक दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा :  “घोटाळे केलेले लोक एकत्र येऊन आता...”; तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन मोदींचा विरोधकांवर निशाणा | Pm modi Modi targets opponents over investigative agencies action abn 97

 मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी प्रौढ मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये, अल्पवयीन मृतांसाठी ५ लाख रुपये आणि ज्यांच्या झोपडय़ा जळाल्या त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अजित पवारांना वाहतुकीच्या नियमाचा विसर, पुण्यात उलट दिशेने चालवली वाहने

Ajit Pawar Violated Traffic Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात वाहतुकीचे नियम मोडल्याचे समोर आलं …

महाराष्ट्रातील ‘या’ गावात आहे भगवान श्रीकृष्ण यांचे सासर; एका शापामुळं झालं होतं उद्ध्वस्त

Amravati:  लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. राज्यात दुसर्या टप्प्यातील मतदान असताना अमरावती …