Kiara Advani Siddharth अडकणार लग्नबेडीत,पेस्टल नव्हे मनिष मल्होत्राच्या लाल लेहंग्यात दिसणार नवरीबाईची सुंदरता

बॉलिवूडमध्ये सध्या एकावर एकाची विकेट पडताना दिसत आहे. KL rahul आणि Athiya Shetty आणि Masaba Gupta आणि Satyadeep Mishra यांच्या लग्नानंतर आता कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 6 फेब्रुवारी 2023 रोजी दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या येत आहेत. राजस्थानच्या जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये हे जोडपे साताजन्मांसाठी एक होणार आहेत. लग्नस्थळी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, कियारा तिच्या लग्नात कोणत्या डिझायनरचा लेहेंगा परिधान करू शकते याबद्दलही अनेक बातम्या समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेल्या सुंदर वेडिंग लेहेंग्यात दिसू शकते असा अंदाज आता वर्तवला जात आहे. (फोटो सौजन्य – Instagram @moheyfashion, @kiaraadvani, @suryagarh)

राजस्थानच्या महालात पार पडणार लग्न

राजस्थानच्या महालात पार पडणार लग्न

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. या लव्हबर्ड्सच्या लग्नाला सुमारे 100-125 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या यादीत अनेक सेलिब्रिटींचीही नावे आहेत. सिद्धार्थ आणि कियाराने लग्नासाठी जैसलमेरचा लोकप्रिय पॅलेस सूर्यगडची निवड केली आहे. करण जोहर ते ईशा अंबानी सारखे पाहुणे या हायप्रोफाईल लग्नाला हजेरी लावणार आहेत. पाहुण्यांच्या मुक्कामासाठी राजवाड्यातील सुमारे 84 आलिशान खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. याशिवाय, पाहुण्यांसाठी 70 हून अधिक गाड्या देखील बुक करण्यात आल्या आहेत, ज्यात मर्सिडीज, जग्वार ते बीएमडब्ल्यूचा समावेश आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी राजस्थानातील जैसलमेरमध्ये पंजाबी रितीरिवाजांनुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. हळद, मेहेंदी, संगीत सोहळ्याला येत्या दोन ते तीन दिवसांत सुरुवात होणार आहे.

हेही वाचा :  कियारा-सिद्धार्थचा शाही थाट; सूर्यगढ पॅलेसमध्ये पार पडणार संगीत सोहळा

(वाचा :- नेट ड्रेसमध्ये भूमिने कंबरेवर हात ठेवत दिल्या मिस युनिव्हर्ससारख्या क्लासी पोझ, काळ्याभोर डोळ्यांनी केलं घायाळ)​

कियारा अडवाणी घालणार या डिझाईनरचा लेहंगा

कियारा अडवाणी घालणार या डिझाईनरचा लेहंगा

कियारा अडवाणी तिच्या लग्नात मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला खास लेहेंगा परिधान करून नववधूच्या रूपात दिसून येऊ शकते. पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान करण्याऐवजी ती सौभाग्याचा पवित्र लालभडक रंगाचा लेहंगा परिधान करून नववधूच्या रूपात दिसणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पण मनीष मल्होत्राच्या विविध डिझाईन्सवर प्रेम दाखवण्याची कियाराची ही काही पहिलीच वेळ नाही. कियारा बहुतेक इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये या डिझाईनरच्या कपड्यांमध्ये दिसून येते, ज्यामध्ये सीक्वीन वर्क जरूर दिसून येते.

(वाचा :- मोत्यांनी जडलेल्या नेट साडीत सोनम कपूरचा रॉयल महाराणी लुक, फिट अँड फाईन फिगर बघून म्हणणारच नाही एका मुलाची आई)​

सीक्वन एम्ब्रॉईडरी आहे कॉमन

सीक्वन एम्ब्रॉईडरी आहे कॉमन

मनीष मल्होत्राच्या कपड्यांमध्ये ट्रेडिशनल लुकसोबतच वेस्टर्न तडकाही बघायला मिळतो, जे आजकालच्या मुलींसाठी एकदम परफेक्ट आउटफिट्स आहेत. फोटोत तुम्ही पाहू शकता की कियारा जरी वर्क असलेल्या लेहेंग्यात दिसून येत आहे, ज्यावर सिक्वेन्स वर्क दिसत आहे. हेच कारण आहे ज्यामुळे तिच्या प्रत्येक अटायरमध्ये शिमरी इफेक्ट दिसून येतो.

हेही वाचा :  नशेत असताना अग्निशमन दलाला फोन केला, कारण ऐकून अधिकाऱ्याचे डोकंच फिरलं

(वाचा :- बिर्ला ग्रुपच्या मालकाची लेक Ananya Birla जणू स्वर्गातील अप्सराच.! अदा व रूप बघून विसराल अंबानींच्या सुना-लेकी)​

साडीतही दिसते हीच खास गोष्ट

साडीतही दिसते हीच खास गोष्ट

सिक्विनचे ​​काम फक्त लेहेंग्यातच दिसते असे नाही, तर साडीवरही हेवी सिक्विन एम्ब्रॉयडरी दिसते. थ्रेड्सच्या मदतीने मल्टीकलरचे सिक्विन जोडले जातात, जे आऊटफिट्स अतिशय सुंदर बनवते. कमी दागिने आणि कमीत कमी मेकअपमध्ये सुंदरी खूपच आकर्षक दिसत आहे. तुम्हालाही शिमरी कपडे आवडत असतील, तर तुम्ही कियाराची स्टाईल ट्राय करू शकता.

(वाचा :- हि-यांनी जडलेला लाखो रूपयांचा नेत्रदिपक बॉडीकॉन ड्रेस, दिशा पाटणीचा इंटरनेटवर आग लावणारा ब्लास्ट लुक आला समोर)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …

कल्याण लोकसभेची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी; रस्त्यावर सापडले शेकडो मतदार ओळखपत्र

Kalyan Lok Sabha : ठाकरे गटाने कल्याण लोकसभेमधील संपूर्ण निवडणूक ही संशयास्पद असून पुन्हा एकदा …