‘प्यार का रंग चढा’ म्हणत एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले kiara-sidharth

बॉलिवूड अभिनेता sidharth malhotra आणि kiara advani यांचे स्वप्नवत वाटणारे लग्न नुकतेच पार पडले. बॉलिवूडमधील काही खास लोकांसाठी त्यांनी मुंबईमध्ये एक रॉयल रिसेप्शन दिले. या रिसेप्शनला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काल व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर त्याच्या लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतो आहे. यामध्ये कपल रोमँटिक पोज देताना दिसत आहे. यामध्ये दोघेही पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. (फोटो सौजन्य :-@kiaraaliaadvani)

कियारा आडवाणीचा लुक

कियारा आडवाणीचा लुक

हळदीच्या कार्यक्रमाला कियाराने जरीदार ऑफ व्हाइट लेहेंगा परिधान केला आहे. या लेहेंग्यावर तिने पिवळ्या रंगाची ओढणी देखील घेतली होती. या ओढणीवर बारीक नक्षी काढण्यात आली होती. घेर असणाऱ्या या लेहेंग्यामध्ये कियारा अगदी परीप्रमाणे भासत आहे. यासोबतच तिने गळ्यात जड नेकपीसही घातला आहे. या कपलचे हे नवीन फोटो चाहत्यांना प्रचंड आवडलेले आहेत. या फोटोवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा :  'मुघल-ए-आझम' ते 'चलती का नाम गाडी'; मधुबालाचे 'हे' सिनेमे आज घबरल्या नक्की पाहा...

(वाचा :- विस्कटलेले केस, हाय हिल्स अन् शॉर्ट ड्रेस, काजोलची लेक न्यासा देवगणचा लुक चर्चेत)​

नाजूक नक्षी असणारे ब्लाऊज

नाजूक नक्षी असणारे ब्लाऊज

कियाराने यावेळी नाजूक नक्षी असणारे ब्लाऊज परिधान केले होते. या ब्लाऊजला मोत्यांनी सजवण्यात आले होते. या ब्लाऊजला गोलनेक लाईन देण्यात आली आहे. या ब्लाऊजच्या कंबारेकडील भागावर चिकनकारीने बारीक नक्षी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे या ब्लाऊजला बॅकलेस ठेवण्यात आले होते. त्यामुळे कियाराचा लुक खूपच सुंदर दिसत होता.

रंग लगाय इश्क दा !

असा होता मेकअप

असा होता मेकअप

यावेळी तिने मॅट मेकअप केला होता. साधा मेकअप केला होता. या सुंदर लुकमध्ये कियाराच्या चेहऱ्यावरील ग्लो स्पष्टपणे दिसत आहे. या फोटोमध्ये दोघंही खूपच सुंदर दिसत आहे.

दागिन्यांचा साज

दागिन्यांचा साज

कियाराने लग्नात आणि रिसेप्शनला पाचूच्या दागिन्यांना पसंती दिली होती. पण हळदीला तिने मोती हिरे आणि पिंक रंगाच्या दागिन्यांना प्रधान्य दिले. या दागिन्यांमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

ओढणीने दिला नवा लुक

ओढणीने दिला नवा लुक

कियाराने यावेळी पिवळ्या रंगाची ओढणी घेतली होती. या ओढणीवर पांढऱ्या रंगाची बुट्टीची नक्षी काढण्यात आली होती. या नक्षीमुळे तिच्या लुकमध्ये चारचॉंद लागले आहेत.

हेही वाचा :  Viju Mane : कुठे चाललो आहोत आपण? विजू मानेंनी सिनेप्रेक्षकांवर साधला निशाणा

(वाचा :- किंग खानची लाडकी लेक सुहानाचा बॉडीकॉन व्हाईट ड्रेसमध्ये कहर, जणू काही बाहुलीच)

सिद्धार्थ मल्होत्राचा लुक

सिद्धार्थ मल्होत्राचा लुक

सिद्धार्थने यावेळी पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. त्याचप्रमाणे त्याने या कुर्तासोबत प्रिंटेड शाल आहे. दोघांचे हे फोटो अपलोड होताच व्हायरल होऊ लागले.

(वाचा :- बस्ती का हस्ती… गळ्यात मोठं लॉकेट, व्हाईट गोल्ड चेन, कुरळ्या केसात MC Stan चा Swag वाला लुक)Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी ‘अशी’ केली तयारी

UPSC Success Story: आपल्या मुलाने चांगल शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावं असं प्रत्येक आईला वाटत …

चंद्र एकाच जागी स्थिरावणार; तब्बल इतक्या वर्षांनी आकाशात दिसणार भारावणारं दृश्य

Lunar Standstill : चंद्र… इथं पृथ्वीवर प्रेमाच्या आणाभाकांपासून खगोलीय घटनांपर्यंत महत्वाच्या भूमिकांमध्ये आणि रुपांमध्ये हा …