‘भलरी…’ गाणं प्रदर्शित; भाऊसाहेब शिंदेचा हटके अंदाज

Bhalari Song: ‘ख्वाडा’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) ‘रौंदळ’ (Raundal) या आगामी मराठी-हिंदी चित्रपटामुळे पुन्हा लाइमलाईटमध्ये आला आहे. ‘बबन’ या गाजलेल्या चित्रपटानंतर ‘रौंदळ’मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांना भाऊसाहेबचा एक नवा अवतार पहायला मिळणार आहे. फर्स्ट लुक, टिझर आणि ‘मन बहरलं…’ या गाण्यानंतर सर्वत्र सध्या ‘रौंदळ’ची चर्चा सुरू आहे. त्यात भर टाकण्यासाठी या चित्रपटातील आणखी एक नवं कोरं गाणं दणक्यात आलंय.

सुगीच्या हंगामात पीक काढणीच्या वेळी समूहाने गायला जाणारा गीतप्रकार  म्हणजेच “भलरी “, हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. भलरीला आपल्या साहित्यात ‘श्रमगीत’ म्हणूनही विशेष दर्जा आहे . हा लोप पावत चाललेला गीतप्रकार ‘रौंदळ’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे. 3 मार्च 2023  रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘रौंदळ’ची निर्मिती भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट या संस्थेअंतर्गत बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी, भाऊ शिंदे आणि राईज बिझनेस ग्रुप यांनी केली आहे. रवींद्र औटी, संतोष औटी , कैलाश गुंजाळ आणि संजय कुंजीर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.  महाराष्ट्रातील अस्सल ग्रामीण बाजाचं श्रमगीत  ‘भलरी…’ हे  संगीतप्रेमींच्या सेवेत रुजू झालं आहे. 

हेही वाचा :  जगभरातील बॉक्स ऑफिसवर पठाणचा डंका; 18 व्या दिवशी केली एवढी कमाई

हे गाणं  बाळासाहेब शिंदे यांनी लिहिलं असून, संगीतकार हर्षित-अभिराज यांनी संगीतबद्ध केलं आहे. गणेश चांदनशिवे, वैशाली माडे आणि हर्षित-अभिराज यांनी आपल्या आवाजाने गाण्याला चार चांद लावलेत.  

पाहा गाणं 

भाऊसाहेब शिंदेनं या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून नेहा सोनावणे ही नवोदित अभिनेत्री त्याच्या साथीला आहे. याखेरीज संजय लाकडे, यशराज डिंबाळे, सुरेखा डिंबाळे, शिवराज वाळवेकर, गणेश देशमुख, सागर लोखंडे आदी कलाकारांच्याही यात भूमिका आहेत. या चित्रपटासाठी सुधाकर शर्मा, डॅा. विनायक पवार यांनीही गीतलेखन केलं असून सोनू निगम, जावेद अली, स्वरूप खान, दिव्य कुमार यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. या गाण्यांवर नेहा मिरजकर यांनी कोरिओग्राफी केली असून, पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांनी दिलं आहे. विक्रमसेन चव्हाण या सिनेमाचे असोसिएट दिग्दर्शक, तर मंगेश भिमराज जोंधळे कार्यकारी निर्माते आहेत.

पाहा रौंदळ चित्रपटातील ‘मन बहरलं हे गाणं: 

 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

बिग बी ते रणवीर सिंह; ‘हे’ कलाकार सांगणार यश चोप्रांच्या आठवणी, द रोमांटिक्स सीरिज ‘या’ दिवशी होणार रिलीज

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …