डायबिटीसमध्ये या पिठामुळे शोषली जाते रक्तातील साखर, Blood Sugar Level कमी होण्यासाठी करा वापर

​जवसाच्या पिठाच्या चपाती वा भाकऱ्या​

​जवसाच्या पिठाच्या चपाती वा भाकऱ्या​

Flax Flour For Diabetes: जवस हे मधुमेहासाठी उत्तम मानले जाते. जवसाच्या पिठाच्या पोळ्या डायबिटीस असणाऱ्या रूग्णांसाठी वरदानच आहे. कोणतीही काळजी न करता तुम्ही जवसाच्या चपाती वा भाकऱ्या जेवणात वापरू शकता. मेटाबॉलिजम वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो. इतकंच नाही तर शरीरातील इन्फ्लेमेशन रोखून शरीर अधिक निरोगी करण्यासाठीही मदत मिळते. अनेक डॉक्टरही जवसाचा आहारामध्ये समावेश करण्याचा सल्ला देतात.

​रागी अर्थात नाचणीच्या पिठाची भाकरी​

​रागी अर्थात नाचणीच्या पिठाची भाकरी​

Ragi Flour For Diabetes: नाचणीच्या पिठामध्ये डाएटरी फायबरचे अधिक गुण आढळतात. मधुमेही व्यक्तींना नेहमीच नाचणीची भाकरी आहारात खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. यामुळे वजनही नियंत्रणात राहाते आणि रक्तातील साखर वाढत नाही. या पिठाच्या चपाती वा भाकऱ्या खाल्ल्याने पोट अधिक काळ भरलेले राहाते आणि सटरफटर खाणे कमी प्रमाणात खाल्ले जाते. तसंच नाचणीचे पीठ हे रक्तातील साखर वाढू देत नाही.

(वाचा – Weight Loss Tips: काय आहे ८०/२० नियम, कसे होते वजन कमी)

हेही वाचा :  डायबिटीससाठी मेथी दाणे ठरतात वरदान, सुरक्षित पद्धत घ्या जाणून

​राजगिऱ्याच्या पिठाच्या भाकरी​

​राजगिऱ्याच्या पिठाच्या भाकरी​

Rajgira Flour For Diabetes: राजगिऱ्याचे दाणे भाजून जे पीठ तयार करण्यात येते, त्याच्या भाकऱ्यांमध्ये अधिक प्रमाणात अँटीडायबेटिक आणि अँटीऑक्सिडंट गुण आढळतात. या पिठाने तयार करण्यात आलेल्या पोळ्या ब्लड शुगर सामान्य राखण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये हाय प्रोटीन, खनिज आणि विटामिन ई चे प्रमाण असून याचा अधिक फायदा मिळतो.

(वाचा – Weight Loss: गुळाचं पाणी पिऊन वजन घटवा, सोपे उपाय)

​ओट्सचे पीठ​

​ओट्सचे पीठ​

Oats Flour For Diabetes: हायफायबर असणारे ओट्स हे मधुमेहाची साखर रक्तात न विरघळता नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तसंच यामध्ये कमी कॅलरीही असते. १०० ग्रॅम ओट्स हे शरीराला केवळ ६८ कॅलरी आण २१ ग्रॅम फायबर देते. त्यामुळे ओट्सच्या पोळ्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींना खाणे फायदेशीर ठरते. तुम्हाला हवं असेल तर ओट्सचे पीठ भिजवताना त्यात कांदा, कोथिंबीर, मीठ आणि तेल टाकून पराठ्याप्रमाणे शेकवा. याची चवही सुंदर लागते.

डायबिटीस आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी तुम्ही या सर्व पिठांचा वापर रोजच्या आहारात नक्कीच करून घ्या आणि पाहा फायदे. मात्र त्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत नक्की करा.

हेही वाचा :  किचनमधील ४ मसाले जे करतील मत्कार, Diabetes रूग्णांनी त्वरीत उचला फायदा

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …