किचनमधील ४ मसाले जे करतील मत्कार, Diabetes रूग्णांनी त्वरीत उचला फायदा

गुणकारी हळद

हळदीतील करक्युमिन नावाचे घटक ब्लड शुगर संतुतिल करण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारते. तसंच इन्शुलिनची सेन्सिटीव्हीटी वाढविण्यासाठीही हळद उपयोगी ठरते. या मसाल्यात अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लमेटरी गुण आढळतात. जे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात. मधुमेही रूग्णांनी नियमित हळदीचे दूध प्यावे. याचाही फायदा मिळतो. मसाल्याचा वापर नियमित करा.

मेथीचे दाणे

तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या दाण्याचे पाणी प्यायल्यास, त्याचा फायदा मिळतो. विशेषतः टाइप – २ डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींना याचा अधिक फायदा मिळतो. या मसाल्यात फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे पचनक्रिया हळू होते आणि मग कार्बोहायट्रेड आणि साखरेची पातळी रक्तात संतुलित राहाते. यासाठी तुम्ही एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी हे गाळून प्या. नियमित प्यायल्यास, डायबिटीसचे प्रमाण कमी आल्याचे दिसून येईल.

(वाचा – मासिक पाळीत गुणकारी ठरतात मेथीचे दाणे, आरोग्यासाठी ५ अफलातून फायदे)

धणे ठरतील फायदेशीर

अनेक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की, धणे हे इन्शुलिनच्या सिक्रिशन वाढविण्यासाठी हातभार लावतात. तसंच यामध्ये असणारे कार्बोहायड्रेट हे शरीरातील मेटाबॉलिजम आणि हायपोग्लायकेमिक प्रक्रिया अधिक चांगली बनविण्यास उपयुक्त ठरते. यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहाते. धणे खाल्ल्यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होते आणि मधुमेहाच्या रूग्णांना याची अत्यंत आवश्यकता असते. याचा वापर करताना तुम्ही रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा धणे मिक्स करा आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी गाळून प्या.

हेही वाचा :  छत्रपती संभाजीराजे असं म्हणाले तरी काय? कोल्हापूर लोकसभेचा आखाडा निवडणुकीआधीच चर्चेत

(वाचा – कोलेस्ट्रॉल होईल झटपट कमी, तुपाबरोबर खा चपाती)

दालचिनी

मधुमेहाच्या रूग्णांसाठी दालचिनी हे कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. कारण हे केवळ ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात आणत नाही तर, रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल एकत्र होऊ देत नाही. तुम्हाला याचे सेवन करायेच असेल तर एक ग्लास दूध गरम करून घ्या आणि त्यात एक चमचा दालचिनी पावडर मिक्स करू रोज प्या. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत मिळते. डायबिटीससह अन्य आजारांवरही ठरते उपयोगी.

घरातील उपाय करताना तुम्ही तुमच्या डॉक्टरांचाही सल्ला घेऊ शकता. मात्र हे उपाय अत्यंत सुरक्षित असून केवळ माहितीसाठी देण्यात आले आहेत. मधुेमेही रूग्णांना याचा नक्कीच फायदा होतो.

(फोटो क्रेडिटः Freepik.com, Canva)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं ‘या’ स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक

Konkan Railway News : मे महिन्याची सुट्टी, शिमगा आणि गणेशोत्सव यादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या …

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं …