या 5 गोष्टी ब्लॉक करतात रक्ताच्या नसा किंवा रक्तवाहिन्या, Heart Attack पासून वाचवतील कार्डियोलॉजिस्टचे हे उपाय

आजच्या काळात, 40, 30 आणि अगदी 20 वर्षे वयोगटातील लोकांमध्येही Heart Attack येणे सामान्य बाब झाली आहे. हा प्राणघातक आजार केवळ High Blood Pressure, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि आळशी जीवनशैली यांचा परिणाम नाही तर हवामानातील बदलामुळे देखील होतो आहे. होय, मंडळी तुम्ही बरोबर वाचलंय. हिवाळ्यात मोठ्या संख्येने लोक हृदयविकाराच्या झटक्याला अर्थात हार्ट अटॅकला बळी पडतात हे एक वास्तव आहे. बँगलोरच्या नारायण हृदयालय मधील कंसल्टेंट इंटरवेंशनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. प्रवीण पी सदर्मिन म्हणतात की, “जगभरात सर्वाधिक मृत्यू हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधित आजार म्हणजेच Cardiovascular Diseases मुळेच होतात.

2008 मध्ये अंदाजे 17.3 मिलीयन लोक मरण पावले, एकूण जागतिक मृत्यूंपैकी 30% मृत्यू म्हणजेच 3 पैकी 1 मृत्यू हृदयविकारामुळे झाला. अशा परिस्थितीत हे टाळण्यासाठी थंडीच्या दिवसात काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यासोबतच या ऋतूत हृदयविकाराचा धोका इतका का वाढतो हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य :- iStock)

हेही वाचा :  Video : विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर लाखो मासे आले कुठून? शेवटी 'या' माशांचे लोकेशन कळाले

हिवाळ्यात होणारा एनजाइना (छातीत वेदना)

हिवाळ्यात होणारा एनजाइना (छातीत वेदना)

हृदयाला ऊर्जा आणि ऑक्सिजन पुरवणाऱ्या कोरोनरी धमन्या गुळगुळीत स्नायूंनी बनलेल्या असतात, ज्यावर थंड हवामानाचा परिणाम होतो. यामुळे रक्त पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे एनजाइनाची स्थिती (छातीत दुखणे) निर्माण होते. ही वेदना अधिक तीव्र असल्यास हार्ट अटॅक येण्याचाही धोका असतो.

(वाचा :- पोट, मांड्या, कंबरेची चरबी झटक्यात जाईल जळून, फॉलो करा एक्सपर्टने सांगितलेला 7 दिवसांचा Weight Loss Diet Plan)​

हिवाळ्यात ब्लड प्रेशर वाढते

हिवाळ्यात ब्लड प्रेशर वाढते

थंड वातावरणात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे सर्व अवयवांपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. याला उच्च रक्तदाबाची समस्या म्हणतात. साधारणपणे, वृद्ध लोकांना थंड हवामानात रक्तदाब वाढण्याचा धोका जास्त असतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित रोग होऊ शकतात.

(वाचा :- व्यायाम व योग करण्याआधी चुकूनही करू नका ही 3 कामे, मजबूत होणं सोडाच शरीराचा सांगडा बनवतील या भयंकर चुका..!)​

कमी प्रकाशामुळे बिघडतो हार्मोनल बॅलेन्स

कमी प्रकाशामुळे बिघडतो हार्मोनल बॅलेन्स

हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठी असते. दिवसाचा प्रकाश आणि रात्रीचा अंधार या मधील हा मोठा बदल हार्मोनल असंतुलनास कारणीभूत ठरतो. विशेषतः कॉर्टिसॉल कमी प्रमाणात सोडले जाते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित रोगांचा धोका वाढतो.

(वाचा :- हे 5 पदार्थ करतात इम्युनिटी लोखंडाइतकी मजबूत, कोरोना ते कॅन्सर कोणताच भयंकर आजार करू शकणार नाही शरीरावर हल्ला)​

हेही वाचा :  हार्ट अटॅकला या ५ सवयी ठरतात घातक, आताच बदला नाही हृदय बंद पडण्याची येईल वेळ

फ्ल्यू मुळे वाढतो हृदयविकाराचा धोका

फ्ल्यू मुळे वाढतो हृदयविकाराचा धोका

हिवाळ्यात फ्ल्यू होणे ही एक सामान्य गोष्ट आहे. शिवाय या कळत सूज देखील येते. दीर्घकाळ सूज झाल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अस्थिरता आणि कोरोनरी धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. या प्रकरणात, फ्लू शॉट हा धोका कमी करू शकतो. 65 वर्षांवरील लोकांसाठी आणि हृदय विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हे सर्वात फायदेशीर आहे.

(वाचा :- Sinus Remedy : सायनस इनफेक्शनमध्ये दिसतात ही भयंकर व वेदनादायी लक्षणं, नाक मोकळं करण्यासाठी घरीच करा हा 1 उपाय)​

जास्त आहार आणि कमी शारीरिक क्रिया

जास्त आहार आणि कमी शारीरिक क्रिया

हिवाळ्यात शारीरिक हालचाल कमी असते. त्यामुळे रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. हिवाळा हा बहुतेक लोकांसाठी सण आणि सुट्टीचा हंगाम आहे. असे लोक काहीही विचार न करता खात-पित असतात, त्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा वाढतो, जे हृदयासाठी धोक्याचे घटक आहेत.

(वाचा :- सडलेल्या व विष भरलेल्या लिव्हरला पुन्हा जिवंत करतात हे 5 पदार्थ, लिव्हर फुटण्याआधी करा डॉक्टरांचे हे सोपे उपाय)​

असा करावा बचाव

असा करावा बचाव

अशा स्थितीत जाणकार सांगतात की स्वतःला उबदार ठेवण्यावर भर द्यावा, थंड हवामानाशी होणारा अनावश्यक संपर्क टाळा आणि हृदयविकार टाळण्यासाठी अन्नाकडे लक्ष द्या. जर तुम्ही आधीच हृदयाचे रुग्ण असाल, तर हृदयरोगतज्ज्ञांकडून नियमित तपासणी करा. तसेच तुमच्या डॉक्टरांनी सुचवलेली आवश्यक औषधे घ्या. याशिवाय, एनजाइनाच्या सर्व रुग्णांनी नेहमी सोबत सॉर्बिट्रेट गोळ्या किंवा नायट्रोग्लिसरीन स्प्रे सोबत ठेवावे कारण ते आणीबाणीच्या परिस्थितीत जीवनरक्षक म्हणून काम करतात.

हेही वाचा :  ब्लास्ट प्रूफ दारं, बंकर, किल्ल्यासारखी सुरक्षा अन्.. 1400 एकरांच्या 'या' स्वर्गात Zuckerberg बांधतोय सिक्रेट घर

(वाचा :- हाडांतील प्रोटिन-कॅल्शियम अक्षरश: शोषून घेतात हे 6 पदार्थ, हाडांचा भुगा होण्याआधी करा AIIMS डॉक्टरांचे हे उपाय)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …