‘या’ सोप्प्या ट्रिक्स वापरून वाढवा लॅपटॉपची बॅटरी लाईफ, डिव्हाइस काम करेल अधिक वेळ, पाहा टिप्स

नवी दिल्ली: ऑनलाइन आणि डिजिटलच्या या जगात तुम्हीही लॅपटॉप वापरत असाल. Work From Home आणि ऑनलाईन शिक्षणामुळे लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सगळी महत्वाची कामं आजकाल लॅपटॉपवरच केली जातात. पण, कधी-कधी काम करत असताना लॅपटॉपची बॅटरी संपते आणि काम मध्येच अडकते. अशात, जर बॅटरी अधिक तास सपोर्ट करत असेल तर लॅपटॉप युजर्सकरिता त्यापेक्षा चांगले काय असू शकते. तुम्हांलाही या समस्येला सामोरं जावं लागत असेल तर, आता टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. Windows11 तुम्हाला या समस्यांवर उपाय देते. या सॉफ्टवेअरमध्ये अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची ऑपरेटिंग सिस्टीम आणि त्याहूनही आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे Battery Management . म्हणजेच आता तुमचा लॅपटॉप तुमच्या मोबाईलप्रमाणे बॅटरी सेव्हर ऑप्शनसह काम करेल. यासाठी तुम्हाला नवीन लॅपटॉप घेण्याची गरज नाही, तर सध्याच्या लॅपटॉपमध्येच विंडोज ११ वर काम सुरू करू शकता.

वाचा: Jio- Airtel-Vi चे सर्वात स्वस्त १० प्लान्स, डेली १ GB डेटासह मिळतात ‘हे’ पैसा वसूल बेनिफिट्स

तुमच्या सूचनांवर काम करेल:
बहुतेक लोकांना हे माहित नसेल की, त्यांच्या लॅपटॉप किंवा टॅब्लेटमध्ये बॅटरी सेव्हर पर्याय असतो. जो Windows 11 सह जास्त काळ बॅटरी वापरण्याची परवानगी देतो. एकदा सेटिंग पूर्ण झाल्यावर, तुमचा लॅपटॉप ऑटोमॅटिक बॅटरी सेव्हर पर्यायावर चालू होतो आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते डीसेबल देखील करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्प्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. बॅटरी सेव्हर कसे सेट करावे? यासाठी सर्व प्रथम, स्टार्ट बटण दाबा आणि त्यात सेटिंग टाइप करा. तुम्हाला पॉवर आणि बॅटरीचा पर्याय सिस्टम मेनूमध्ये दिसेल. बॅटरी विभागात जा आणि बॅटरी सेव्हर पर्यायावर क्लिक करा.

हेही वाचा :  ना Flipkart और ना Amazon, येथे सुरु झाला Republic Day Sale, मिळतोय 70 टक्के डिस्काऊंट

यानंतर Turn On Now वर क्लिक करा. आता तुम्ही बॅटरीची टक्केवारी सेट करा. त्यानंतर Battery Saver पर्याय सक्रिय करावा लागेल. या समस्यांसाठी तयार रहा: तुमच्या लॅपटॉपची बॅटरी ठराविक टक्केवारीच्या खाली आल्यावर बॅटरी सेव्हर पर्याय सक्रिय होईल आणि लॅपटॉप सामान्यपेक्षा जास्त काळ चालत राहील. एकदा बॅटरी सेव्हर पर्याय सक्रिय झाल्यानंतर, तुमच्या डिव्हाइसचा, Laptop, Tablet चा एकूण परफॉर्मन्स कमी होऊ शकतो . इतकंच नाही तर कधी-कधी तुम्हाला लॅपटॉप किंवा टॅबलेट मध्ये लॅगिंगच्या समस्येलाही सामोरे जावे लागू शकते.

वाचा: झटका! आता Netflix युजर्सना ‘यासाठीही’ मोजावे लागतील पैसे, पाहा डिटेल्स

वाचा: घरात ‘या’ ठिकाणी ‘असे सेट करा Wi-Fi, इंटरनेट स्पीड कमी होणारच नाही, पाहा या ट्रिक्स

वाचा: तुम्हीही आधार कार्डसंबधी ‘या’ गोष्टीकडे दुर्लक्ष करत असाल तर, व्हा अलर्ट, होऊ शकते मोठे नुकसान

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …