सुष्मिता सेनच्या डॉक्टरांनी हार्ट अटॅकसाठी सांगितले 5 उपाय,नैसर्गिकरित्या संपवतात जीवाचा धोका

अभिनेत्री Sushmita Sen सोबत काही दिवसांपूर्वी अशो गोष्ट घडली की ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. मिस युनिव्हर्स हा किताब कमावणारी आणि आपल्या सौंदर्याने आजही सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री सुष्मिता सेनने स्वत: एक गोष्ट कबुल केली की जी कळल्यावर अनेकांच्या नजरा विस्फारल्या. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटला एक पोस्ट टाकली आणि वडिलांसोबतचा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी केली आणि नसांमध्ये स्टेंट टाकले.” तिने ही गोष्ट उलगडताच तिच्या तब्येतीविषयी सगळीकडूनच विचारपूस होऊ लागली.

फिटनेस फ्रिक असूनही सुष्मिताला हार्ट अटॅकला सामोरे जावे लागले आणि तिच्या हृदयात मोठा ब्लॉकेज असणे ही खरंच गंभीर गोष्ट होती. सुदैवाने ती आता ठीक असली तर काही प्रश्न मात्र आपल्याही मनात उद्भवतात की सुष्मिता तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते, मग तिला Heart Attack कसा आला? 95% ब्लॉकेज असूनही तिने एवढा मोठा धक्का कसा सहन केला? सुष्मिताचे कार्डियोलॉजिस्ट डॉ राजीव भागवत यांनी TOI ला दिलेल्या मुलाखतीत अशाच काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ते काय म्हणाले आणि या घटनेतून तुम्ही कोणता धडा घेतला पाहिजे ते जाणून घेऊया. (फोटो सौजन्य :- iStock and sushmitasen47)

महिलांमध्ये वाढत आहे हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण

महिलांमध्ये वाढत आहे हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण

डॉक्टरांनी सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण आता केवळ पुरुषांमध्येच नाही तर महिलांमध्येही वेगाने वाढत आहे. पूर्वीच्या तुलनेत आजच्या युगातील महिलांना अधिक आव्हाने आणि जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागत आहे. ती ऑफिस आणि घरी दोन्ही काम सांभाळत असते. त्यांच्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे त्यांचा ताण वाढला आहे.
(वाचा :- Anti Aging: वयाच्या 60 नंतरही येणार नाही म्हातारपण, कायम दिसाल अनिल कपूरसारखे तरूण-फिट, खायला घ्या हे 5 पदार्थ)​

हेही वाचा :  अजित पवार भाजपात सामील झाल्यास शिंदे गट सत्तेतून बाहेर पडणार? पक्षाच्या प्रवक्त्यांचं मोठं विधान

हार्ट अटॅकची कारणे

 हार्ट अटॅकची कारणे

डॉक्टरांनी सांगितले की तणावा व्यतिरिक्त अन्य असे काही घातक आहेत जे हृदयविकाराच्या झटक्यासाठी कारणीभूत ठरतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि तंबाखूचे सेवन ही ती काही कारणे आहेत जी हृदयविकाराच्या झटक्यांचे मूळ स्थान असू शकतात. याशिवाय काहींना अनुवांशिक कारणांमुळे सुद्धा हृदयविकाराच्या झटक्यांचा धोका असतो.

(वाचा :- Anti Cancer Vegetables: कॅन्सरच्या कट्टर दुश्मन आहेत या 10 भाज्या, कॅन्सर पेशींचा जन्म घेण्याआधीच करतात खात्मा)​

फिजिकल एक्टिव्हीटी गरजेची आहे

फिजिकल एक्टिव्हीटी गरजेची आहे

डॉक्टरांनी स्पष्ट केले की सक्रिय जीवनशैली जगल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, तसेच तणाव आणि नैराश्य कमी होते. सुष्मिताच्या बाबतीत सांगायचे तर ती रोज फिटनेस वर लक्ष द्यायची, तिची फिजिकल एक्टीव्हीटी उत्तम होती आणि मुख्य म्हणजे तिची जीवनशैली सक्रीय होती आणि म्हणून तिला कमी त्रास सहन करावा लागला. शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणं खूप महत्त्वाचं आहे, हा धडा प्रत्येकाने सुष्मिताकडून घ्यायला हवा.
(वाचा ;- Weight Loss Diet : ‘हे’ 4 उपाय नऊ रात्रींमध्ये जाळतील पोट, मांड्या व कंबरेवरची एकूण एक चरबी, पाठ-पोट होईल सपाट)​

आठवड्यातून 3 ते 4 वेळा करा व्यायाम

-3-4-

डॉक्टरांनी सांगितले की हे दररोज व्यायाम केला नाही तरी चालेल, परंतु आठवड्यातून फक्त 3 ते 4 दिवस तरी व्यायाम करून शारीरिक हालचाल केली पाहिजे. व्यायामाच्या ताणातून सावरण्यासाठी तुम्ही तुमच्या शरीराला वेळ द्यावा. विश्रांती आणि पुरेशी झोप न घेता सतत व्यायाम केल्याने सुद्धा शरीराला धोका निर्माण होऊ शकतो.
(वाचा :- Mental Health: मेंटल बनवू शकतात ऑफिसच्या या 4 गोष्टी, हे 7 उपाय करा, काम होईल जबरदस्त व टेन्शन होईल कायमचं गुल)​

हेही वाचा :  'एवढी मस्ती कुठून आली?', छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल, म्हणाले "गोपीनाथ मुंडे असते तर..."

7 ते 8 तास झोप

7-8-

डॉक्टरांनी सांगितले की बरेच लोक रात्री दोन वाजता झोपतात आणि सकाळी सहा वाजता जिममध्ये जातात किंवा जॉगिंग करतात. अनेक तरुण ही चुकीची पद्धत फॉलो करत आहेत. यामुळेच जिम मध्ये मृत्यू होण्याची अनेक प्रकरणे घडतान दिसून येत आहेत. जिमला वा जॉगिंगला जाण्यापूर्वी 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे. फक्त 2 किंवा 3 तासांची झोप पुरेशी नाही. जिमिंग ही फॅशन नाही, ती एक आरोग्यदायी क्रिया आहे. प्रमाणापेक्षा जास्त जिम करणे आरोग्यासाठी घातक आहे.
(वाचा :- Omega3 Foods: मेंदूच्या नसा पार सुकवते ओमेगा 3 ची कमतरता, ब्रेन डेड होण्याआधी 5 लक्षणं दिसतात, खा हे 15 पदार्थ)​

योग्य वेळी योग्य हॉस्पिटलला जा

योग्य वेळी योग्य हॉस्पिटलला जा

डॉक्टरांनी सांगितले की, जर एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला असेल तर एखाद्याने अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसाठी चांगल्या सुविधा असलेल्या रुग्णालयात जावे. सुष्मिताने कोणत्याही इशारे किंवा संकेतांकडे दुर्लक्ष केले का? यावर डॉक्टरांनी सांगितले की, हे सांगणे कठीण आहे, पण सुष्मिता भाग्यवान आहे, ती योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी आली असे म्हणू शकतो.
(वाचा :- Weight Loss: स्वत: शोधून काढली ट्रिक अन् मेणासारखी वितळून पातळ झाली पोटावरची चरबी, घरच्या घरी केले 22 किलो कमी)​

हेही वाचा :  नसांत घाणेरडं कोलेस्ट्रॉल साचल्याने येतो हार्ट अटॅक,हा हिरवा पदार्थ नसा करतो मुळापासून साफ

वजन, ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल लेव्हल नियंत्रित ठेवा

वजन, ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल लेव्हल नियंत्रित ठेवा

डॉक्टरांनी सांगितले की हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही तुमचे वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे. ते म्हणाले की, भारतातील अनेकांना आपण मधुमेही आहोत हे माहीत नाही, त्यांच्या कोलेस्टेरॉलची पातळी सामान्यपेक्षा जास्त आहे हे त्यांना माहीत नाही. आजच्या काळात यावर अनेक उपचार ले आहेत. पण उपचार आहेत म्हणजे आजार झाला तर बघून घेऊ या मनस्थितीत न राहता तो आजार वाढणारच नाही यावर लक्ष दिले पाहिजे.
(वाचा :- High Uric Acid: औषधं व डॉक्टशिवाय युरिक अ‍ॅसिडचं पार पाणी पाणी करतात हे 3 उपाय, गुडघेदुखी व मुतखडा होईल छुमंतर)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …