Grammy Awards 2022 : ‘लीव्ह द डोर ओपन’ने पटकावला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार

Grammy Awards 2022 : जगभरात ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) मानाचा मानला जातो. ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. नुकताच लॉस वेगासमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. हा सोहळा आधी 31 जानेवारीला होणार होता. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. मात्र, लॉस वेगासमध्ये सुरू असलेल्या या रंगतदार सोहळ्यात ‘लीव्ह द डोर ओपन’ या गाण्याने यंदाचा ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. हे गाणं अमेरिकेतील लोकप्रिय गायक ब्रूनो मार्स आणि अॅंडरसन पाकने संगीतबद्ध केले आहे. 

विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा

सर्वोत्कृष्ट गाणं : लीव्ह द डोर ओपन
सर्वोत्कृष्ट रॉक सादरीकरण : फू फायटर्स
सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम : स्टार्टिंग ओव्हर
सर्वोत्कृष्ट प्रोग्रेसिव्ह अल्बम : लकी डे
सर्वोत्कृष्ट रॅप गाणं : केन्ये वेस्ट
सर्वोत्कृष्ट कोरल सादरीकरण : गुस्तावो डुडामेल, ग्रॅंटा गेशॉन, ल्यूक मॅकडार्फर
सर्वोत्कृष्ट शास्त्रीय गायन : कॅरोलिन शॉ
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : स्टीफन कॉक्स
सर्वोत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मन्स : ओलिविया रोड्रिगो
सर्वोत्कृष्ट नृत्य : रुफुझ डू सोल
पारंपारिक पॉप अल्बम – लव फॉर सेल 
सर्वोत्कृष्ट पॉप सिंगर अल्बम – लव्ह फॉर सेल
सर्वोत्कृष्ट रॉक अल्बम – फू फायटर्स
सर्वोत्कृष्ट रॉक गाणं – फू फायटर्स

हेही वाचा :  नेटकऱ्यानं केलं ट्रोल, मानसीचं सडेतोड उत्तर

ए आर रहमानदेखील ग्रॅमी सोहळ्यात सहभागी!

भारतीय संगीतकार ए. आर. रहमान देखील ग्रॅमी अवॉर्ड्सचा एक भाग बनले आहेत. त्यांनी देखील आपल्या मुलासोबत या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आहे.

संबंधित बातम्या

RRR OTT Release Date : राजामौलींचा ‘आरआरआर’ सिनेमा ‘या’ दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात व्लादिमीर झेलेन्स्की यांचा खास संदेश; म्हणाले, ‘भयानक शांततेचं रूपांतर संगीतात करा’

Grammy Awards 2022 : थाटात पार पडला ग्रॅमी पुरस्कार सोहळा; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …